रिसोड करडा सोसायटी

करडा सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. धिरजकुमार देशमुख तर उपाध्यक्षपदी शामभाऊ देशमुख यांची अविरोध निवड

Risod Karda Society: रिसोड तालुक्यातील सेवा सहकारी संस्था मर्या. करडा येथे संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. धीरज वामनराव देशमुख, तर उपाध्यक्षपदी शामभाऊ नारायणराव देशमुख यांची अविरोध निवड करण्यात आली.

करडा सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. धिरजकुमार देशमुख तर उपाध्यक्षपदी शामभाऊ देशमुख यांची अविरोध निवड

Risod Karda Society

रिसोड (Risod Karda Society) : रिसोड तालुक्यातील सेवा सहकारी संस्था मर्या. करडा येथे संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. धीरज वामनराव देशमुख, तर उपाध्यक्षपदी शामभाऊ नारायणराव देशमुख यांची अविरोध निवड करण्यात आली. दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी करडा येथील सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयात संस्थेच्या पदाधिकारी निवडीसाठी सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेसाठी  पी. आर. वाडेकर, सहकार अधिकारी, देऊळगाव राजा हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते.

अध्यक्षपदासाठी  गंभीरराव  देशमुख यांनी डॉ. धीरज देशमुख यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर उपाध्यक्षपदासाठी गजाननराव  देशमुख यांनी  शामभाऊ  देशमुख यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी  पी. आर. वाडेकर यांनी डॉ. धीरज देशमुख यांची अध्यक्षपदी, तर  शामभाऊ  देशमुख यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

या (Risod Karda Society) निवडणूक सभेस  गंभीरराव  देशमुख,  गजानन  देशमुख,  झनकराव देशमुख,प्रभाकर  देशमुख,  भाऊराव  देशमुख, भुजंगराव  देशमुख,  कैलासराव  देशमुख, रमेशराव  धांडे, लक्ष्मण  कुरवाडे, सौ. मुक्ताबाई अंकुशराव देशमुख आणि श्रीमती पुष्पाबाई चिंतागराव देशमुख यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते. अकोला व वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे युवा संचालक  डॉ. धिरजकुमार देशमुख  यांची सलग चौथ्यांदा सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली. निवडीनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष वामनरावजी देशमुख  यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच उपस्थित सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी संस्थेच्या कामकाजात  भास्करराव मोरे, सहायक अधिकारी, तसेच  सुरेशराव देशमुख, संस्थेचे गटसचिव आणि भानुदास धांडे यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. धीरज देशमुख यांनी, “संस्थेच्या कार्यक्षेत्रातील कोणताही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही, यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू,” अशी ग्वाही दिली.

संबंधित सामग्री

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026