Dhangar Reservation

'विश्वासघात दिवस' पाळत धनगर समाजाचा लातूरमध्ये फडणवीस सरकारविरोधात तीव्र निषेध

अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीवरून धनगर समाजाने लातूरमध्ये तीव्र आंदोलन केले.

'विश्वासघात दिवस' पाळत धनगर समाजाचा लातूरमध्ये फडणवीस सरकारविरोधात तीव्र निषेध

Dhangar Reservation

एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी; काळ्या फिती बांधून घोषणाबाजी, सरकारने दिलेला शब्द पाळण्याची मागणी

लातूर : अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीवरून धनगर समाजाने लातूरमध्ये तीव्र आंदोलन केले. सरकारने आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ २९ जुलै हा दिवस 'विश्वासघात दिवस' म्हणून पाळण्यात आला. यानिमित्त लातूर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी हाताला काळ्या फिती बांधून फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात मोठ्या संख्येने समाजबांधव एकत्र आले होते. आंदोलनादरम्यान "आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे!" तसेच "सरकारने दिलेला शब्द पाळावा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

या आंदोलनात चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर, धनराज माने, व्यंकट सूर्यवंशी, गंगाधर ढोणे, संदेश गडदे, आकाश किसवे, बालाजी लव्हे यांच्यासह धनगर समाजातील अनेक कार्यकर्ते आणि समाजबांधव सहभागी झाले होते.

समाजाच्या रोषातून २९ जुलै ठरला 'विश्वासघात दिवस'

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात आरक्षण देण्याचे आश्वासन सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. "माझा आरक्षणाचा अभ्यास झाला असून, सत्तेत आल्यावर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल," असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. मात्र, अनेक वर्षे उलटूनही या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्याने सरकारने समाजाचा विश्वासघात केल्याची भावना धनगर समाजात निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी २९ जुलै हा दिवस 'विश्वासघात दिवस' म्हणून पाळला जात आहे.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या

  • आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी: 'धनगड' आणि 'धनगर' हे एकच असल्याचे मान्य करून धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात तात्काळ समावेश करावा आणि आरक्षण लागू करावे.
  • आश्वासनाची पूर्तता: निवडणुकीपूर्वी दिलेल्या शब्दाची सरकारने त्वरित पूर्तता करावी आणि समाजाची दिशाभूल थांबवावी.

आंदोलकांची भूमिका

"जोपर्यंत एसटी प्रवर्गातील आरक्षणाची अधिकृत अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत धनगर समाजाचा हा लढा सुरूच राहणार आहे. पुढील काळात हा लढा आणखी तीव्र करण्यात येईल."

— चंद्रकांत हजारे, आंदोलक

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026