डिझेल टंचाईचा फटका : हिंगोलीतील संत नामदेव हळद मार्केट सोमवारपासून बंद

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यभरात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईचा थेट परिणाम हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील हळद व्यापारावर झाला आहे.

डिझेल टंचाईचा फटका : हिंगोलीतील संत नामदेव हळद मार्केट सोमवारपासून बंद

Diesel Shortage

वाहतुकीवर परिणाम; शेतकऱ्यांना हळद विक्रीसाठी न आणण्याचे आवाहन

हिंगोली (Diesel Shortage) : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यभरात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईचा थेट परिणाम हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील हळद व्यापारावर झाला आहे. लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी डिझेल उपलब्ध होत नसल्याने संत नामदेव हळद मार्केट २५ मे, सोमवारपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारपासून हळद विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सध्या हिंगोलीच्या संत नामदेव मार्केटमध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी हळद विक्रीसाठी येथे येतात. दररोज शेकडो वाहनांतून हळदीची आवक होत असून बाजार समितीचा मोंढा गजबजलेला असतो. मात्र मागील आठवडाभरापासून डिझेलचा तुटवडा जाणवू लागला आहे. सुरुवातीला वाहनचालकांना टाक्यांमधून व कॅनमधून डिझेल दिले जात होते. परंतु जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव त्यावर निर्बंध घातले आहेत. आता प्रत्येक वाहनचालकाला थेट पेट्रोल पंपावर वाहन नेऊनच डिझेल भरावे लागत आहे.

अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा साठा संपल्याने वाहनचालकांना डिझेलसाठी एक-दोन दिवस तळ ठोकून थांबावे लागत आहे. हळद ही नाशवंत नसली तरी लांब पल्ल्याच्या बाजारपेठेत, विशेषतः सांगली, ईरोड, निजामाबाद येथे वेळेत पोहोचवणे आवश्यक असते. डिझेलअभावी वाहतूक ठप्प झाल्याने व्यापारी आणि वाहनचालक दोघेही मोठ्या अडचणीत सापडले आहेत. माल वेळेत पोहोचला नाही तर सौदे रद्द होण्याची व नुकसान होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. डिझेल टंचाईची गंभीर परिस्थिती आणि वाहतुकीतील अडथळे लक्षात घेऊन समितीने २५ मेपासून हळद लिलाव व खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. डिझेलचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर व वाहतूक पूर्वपदावर आल्यानंतर बाजार पुन्हा सुरू करण्याबाबत स्वतंत्रपणे कळवण्यात येईल, असे सचिवांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ऐन हंगामात मोंढा बंद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक शेतकऱ्यांनी हळद काढून विक्रीसाठी तयार ठेवली आहे. बाजार समितीने शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून तोपर्यंत हळद साठवून ठेवावी व विनाकारण वाहतूक खर्च करू नये, असे कळवले आहे. डिझेल टंचाई लवकर दूर व्हावी, अशी मागणी व्यापारी व शेतकरी वर्गातून होत आहे.

संबंधित सामग्री

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026