गोरेगावात डिझेलसाठी किरकोळ कारणावरून पेट्रोल पंपावर वादावादी

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील एका पेट्रोल पंपावर डिझेल मिळविण्यासाठी लागलेल्या रांगेत किरकोळ कारणावरून वादावादी होऊन भांडणतंट्याची घटना घडली.

गोरेगावात डिझेलसाठी किरकोळ कारणावरून पेट्रोल पंपावर वादावादी

Diesel Shortage

हिंगोली (Diesel Shortage) : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील एका पेट्रोल पंपावर डिझेल मिळविण्यासाठी लागलेल्या रांगेत किरकोळ कारणावरून वादावादी होऊन भांडणतंट्याची घटना घडली. ही घटना दि. २२ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. गोंधळ वाढत असताना पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आणि शांतता निर्माण झाली. काही काळ डिझेल विक्री थांबवून गर्दीला पांगवण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवेमुळे विविध पेट्रोल पंपांवर विशेषतः डिझेलसाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागत असल्याचे चित्र आहे. वाहन वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था मोठ्या प्रमाणात डिझेल इंधनावर अवलंबून असल्याने वाहनधारकांकडून डिझेल साठवण्याकडे कल वाढला आहे.

ग्रामीण भागात सध्या शेती मशागतीची कामे सुरू असल्याने ट्रॅक्टरसाठी डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गोरेगाव येथील संबंधित पेट्रोल पंपावर सर्वांना डिझेल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न पंप चालकांकडून केला जात असला तरी वाढत्या गर्दीमुळे लाईनमध्ये पुढे-मागे होणे, नंबर लावण्यावरून किरकोळ वाद निर्माण होत आहेत.

अशाच प्रकारे २२ मे रोजी रात्री डिझेल वितरण सुरू असताना अचानक किरकोळ कारणावरून वादावादी झाली आणि त्याचे रूपांतर भांडणतंट्यात झाले. परिस्थिती चिघळत असताना पोलिस जमादार राठोड हे पोलिस कुमक घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या हस्तक्षेपामुळे वाद आटोक्यात आला.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक निलेश लेनगुळे यांनी नागरिकांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले. काही वेळासाठी डिझेल विक्री थांबवून गर्दी कमी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा इंधन वितरण पूर्ववत सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026