डिग्रस अवकाळी पाऊस

अवकाळी पावसाचा फटका: वीजपुरवठा खंडित झाल्याने हिंगोलीचा पाणीपुरवठा विस्कळीत  

Digras unseasonal rain: डिग्रस कर्हाळे येथे सोमवारी अवकाळी पावसाने वीजपुरवठा खंडित झाला. सिद्धेश्वर जलशुद्धीकरण केंद्राच्या 33 केव्ही विद्युत वाहिनीवर फॉल्ट झाल्याने वीजपुरवठा बंद

अवकाळी पावसाचा फटका: वीजपुरवठा खंडित झाल्याने हिंगोलीचा पाणीपुरवठा विस्कळीत  

Digras unseasonal rain

हिंगोली (Digras unseasonal rain) : डिग्रस कर्‍हाळे व परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सिद्धेश्वर जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. जोरदार वाऱ्यामुळे 33 केव्ही क्षमतेच्या मुख्य विद्युत वाहिनीवर फॉल्ट निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे.  

प्राप्त माहितीनुसार, 33 केव्ही वाहिनीवर फॉल्ट येताच 220 केव्ही उपकेंद्रातून पुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंत्यांनी दोन वेळा ट्रायल घेतली. मात्र दोन्ही वेळेस ‘हँड टू हँड ट्रिपिंग’ झाल्याने वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकला नाही. 

दिग्रस शहर व परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सिद्धेश्वर जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. (Digras unseasonal rain) जोरदार वाऱ्यामुळे 33 केव्ही क्षमतेच्या मुख्य विद्युत वाहिनीवर फॉल्ट निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे.  

प्राप्त माहितीनुसार, 33 केव्ही वाहिनीवर फॉल्ट येताच 220 केव्ही उपकेंद्रातून पुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंत्यांनी दोन वेळा ट्रायल घेतली. मात्र दोन्ही वेळेस ‘हँड टू हँड ट्रिपिंग’ झाल्याने वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकला नाही. सध्या सिद्धेश्वर जलशुद्धीकरण केंद्रासह डिग्रस कर्‍हाळे या (Digras unseasonal rain) भागातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा बंद आहे. वीज खंडित झाल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील पंप बंद पडले असून शहराचा पाणीपुरवठा तात्पुरता थांबवावा लागला आहे.  

दरम्यान, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून 33 केव्ही वाहिनीवरील फॉल्ट शोधून तो दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पाऊस व वाऱ्यामुळे पेट्रोलिंग करून बिघाडाचे नेमके ठिकाण शोधण्यात अडचणी येत आहेत. तरीही कर्मचारी परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.  

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर तात्काळ जलशुद्धीकरण केंद्राचे पंप सुरू करून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल. तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अवकाळी संकटामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीतून लवकरच मार्ग निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डिग्रस कर्‍हाळे या भागातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा बंद आहे. वीज खंडित झाल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील पंप बंद पडले असून शहराचा पाणीपुरवठा तात्पुरता थांबवावा लागला आहे.  

दरम्यान, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून 33 केव्ही वाहिनीवरील फॉल्ट शोधून तो दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पाऊस व वाऱ्यामुळे पेट्रोलिंग करून बिघाडाचे नेमके ठिकाण शोधण्यात अडचणी येत आहेत. तरीही कर्मचारी परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.  

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर तात्काळ जलशुद्धीकरण केंद्राचे पंप सुरू करून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल. तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अवकाळी संकटामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीतून लवकरच मार्ग निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026