लैंगिक अत्याचार प्रकरण

दिव्यांग तरुणीवर लैंगिक अत्याचार; चिखली तालुक्यातील बोरगाव वसु येथील घटना

Sexual assault case: चिखली तालुक्यातील बोरगाव वसु येथे २२ वर्षीय दिव्यांग तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना ५ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे.

दिव्यांग तरुणीवर लैंगिक अत्याचार; चिखली तालुक्यातील बोरगाव वसु येथील घटना

Sexual assault case

 

आरोपीविरुद्ध ॲट्रॉसिटीसह गंभीर कलमांखाली गुन्हा

चिखली (Sexual assault case) : चिखली तालुक्यातील बोरगाव वसु येथे २२ वर्षीय दिव्यांग तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना ५ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी सवणा येथील शेख रब्बानी शेख गणी (वय ३५) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा तसेच दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ अंतर्गत गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते १.२० वाजण्याच्या सुमारास बोरगाव वसु येथील स्मशानभूमीच्या पाठीमागे असलेल्या नाल्याजवळ पीडित तरुणी शौचासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करून तिच्या दिव्यांगत्वाचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या (Sexual assault case) घटनेनंतर पीडितेच्या ४० वर्षीय आईने चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध BNS कलम 64(1), 64(2)(k), 78, तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याच्या कलम 3(1)(w)(i), 3(1)(w)(ii), 3(2)(5), 3(2)(va) आणि दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ च्या कलम 92(d) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

संबंधित सामग्री

लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

Latur Sexual Assault Case: नागझरी येथे आरोपीने १२ वर्षीय मुलीच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेत तिला लातूर शहर फिरवून आणण्याचे सांगितले. त्यानंतर तिला दुचाकीवरून पुणे

Oct 02, 2026
दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

Consumers Hit by Inflation: विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी डाळी, तेल, तूप आणि अन्य किराणा वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. बाजारात कडधान्यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खर्चात भर

Sep 30, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
‘निर्भयानंतर किती बदल झाला?’ दिल्ली-NCRमधील घटनांवर सुप्रीम कोर्टाचा गंभीर सवाल

‘निर्भयानंतर किती बदल झाला?’ दिल्ली-NCRमधील घटनांवर सुप्रीम कोर्टाचा गंभीर सवाल

दिल्ली-NCRमधील लैंगिक अत्याचारांच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाची सुओ मोटू दखल; सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेवर दिल्ली पोलिसांना सवाल.

Sep 28, 2026
गांधींच्या वर्धा जिल्ह्याला हादरवणारी घटना; तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप

गांधींच्या वर्धा जिल्ह्याला हादरवणारी घटना; तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप

वर्ध्यात 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचाराचा आरोप; पाच अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल. रेल्वे स्थानकातील CCTV आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू.

Sep 26, 2026