महाराष्ट्र रस्ते अपघाती मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident

 

राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात; अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

मुंबई (Maharashtra Road Accident) : रस्ते अपघात रोखण्यासाठी महत्त्वाची असलेली राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची बैठक तब्बल तीन वर्षांनंतर पार पडली. 3 एप्रिल 2023 रोजी परिषदेची बैठक झाली होती. त्यानंतर 22 सप्टेंबर रोजी 13वी राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक घेण्यात आली. या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघातांची वाढती संख्या आणि त्यातून होणारी जीवितहानी लक्षात घेता रस्ते सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. या (Maharashtra Road Accident) पार्श्वभूमीवर बैठकीत अपघातांचे प्रमाण आणि मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अपघात रोखण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले. पोलीस, सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय साधून अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करावीत आणि तेथे आवश्यक सुधारणा तातडीने कराव्यात, असे निर्देश देण्यात आले.

बैठकीत रस्ते सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी, (Maharashtra Road Accident) अपघातप्रवण ठिकाणांवरील सुधारणा, वाहतूक नियंत्रण तसेच अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. रस्ते सुरक्षेसाठी केवळ बैठका घेण्यापेक्षा त्यात घेतलेल्या निर्णयांची वेळेत आणि प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. विविध विभागांमध्ये समन्वय वाढवून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस कृती आराखडा राबविण्यावर भर देण्यात आला.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026