Disability Students

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष तपासणी शिबिर; २३३ विद्यार्थ्यांची तपासणी, २७९ साहित्य साधनांची नोंदणी

समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार आवश्यक साहित्य साधने व उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी चिखली येथे विशेष तपासणी व मोजमाप शिबिर घेण्यात आले.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष तपासणी शिबिर; २३३ विद्यार्थ्यांची तपासणी, २७९ साहित्य साधनांची नोंदणी

Disability Students

चिखलीतील दोन दिवसीय शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी; व्हीलचेअर, श्रवणयंत्र, ट्रायसायकल, इलेक्ट्रिक ब्रेल किटसह विविध उपकरणांसाठी मोजमाप

चिखली : समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार आवश्यक साहित्य साधने व उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी चिखली येथे विशेष तपासणी व मोजमाप शिबिर घेण्यात आले. या दोन दिवसीय शिबिरात तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील एकूण २३३ दिव्यांग विद्यार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या २७९ साहित्य साधने व उपकरणांची नोंदणी करण्यात आली.

शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या पत्रानुसार समग्र शिक्षा अंतर्गत मतिमंद, बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सी, अस्थिव्यंग, कर्णबधिर, लेप्रोसी क्युअर्ड, ड्वार्फिझम, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, ॲसिड अटॅक पीडित तसेच अंध विद्यार्थ्यांसह विविध प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत अलिम्को संस्था, मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने ० ते १८ वर्षे वयोगटातील अंगणवाडी आणि शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी केली. विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या साहित्य साधने व उपकरणांसाठी त्यांचे मोजमापही यावेळी करण्यात आले.

चिखली येथील शिवाजी अध्यापक विद्यालयात १ व २ सप्टेंबर २०२६ रोजी हे शिबिर पार पडले. बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार आणि मेहकर या तालुक्यांतील दिव्यांग विद्यार्थी शिबिरात सहभागी झाले होते. दोन दिवसांच्या कालावधीत एकूण २३३ विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या तपासणीनंतर त्यांच्या गरजेनुसार व्हीलचेअर, कॅलिपर, श्रवणयंत्र, सीपी चेअर, ट्रायसायकल, इलेक्ट्रिक ब्रेल किट, डीएलएम किट आणि लो व्हिजन किट यांसह विविध साहित्य साधने व उपकरणांसाठी नोंदणी करण्यात आली. एकूण २७९ साहित्य साधनांसाठी आवश्यक मोजमाप आणि नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

शिबिरात बुलढाणा जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक, फिजिओथेरपिस्ट तसेच ऑडिओलॉजिस्ट यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. चिखली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव शिंदे यांनीही शिबिराला उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी सहकार्य केले. २ सप्टेंबर रोजी १२ विद्यार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून त्यांना आवश्यक साहित्य साधनांसाठी फिटमेंट करण्यात आले.

शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी उमेश जैन आणि गट समन्वयक प्रवीण वायाळ यांनी शिबिराच्या नियोजनात पुढाकार घेतला. तसेच तालुक्यातील विशेष शिक्षकांनी दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी, बैठक व्यवस्था, तपासणी आणि इतर आवश्यक व्यवस्थांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वीपणे पार पडले.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

Chikhli gangster Ishwar Dhanwate: शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाई सुरू ठेवली आहे. अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्या

Oct 06, 2026
बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शंकर भारसाकळे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी कर्ज आणि आर्थिक संकटाचा उल्लेख केल्याचे समोर आले.

Oct 03, 2026
सेवा संकल्प अभियानातून स्वच्छ चिखलीचा संदेश; माजी सैनिकांचा सन्मान

सेवा संकल्प अभियानातून स्वच्छ चिखलीचा संदेश; माजी सैनिकांचा सन्मान

Chikhli Seva Sankalp Mission: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवापर्वानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान

Oct 02, 2026
मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाखांची मदत; वाढदिवसानिमित्त मुख्याधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाखांची मदत; वाढदिवसानिमित्त मुख्याधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

Chief Officer Prashant Bidkar: चिखली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीत १ लाख रुपयांची मदत जमा केली.

Oct 01, 2026