रिसोड (Dr. Babasaheb Ambedkar) : येथील भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न,प्रख्यात विद्वान,थोर समाज सुधारक, बोधिसत्व, डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची १३५ वी जयंती १४ एप्रिल २०२६ मंगळवारला शाळेच्या सभागृहात अतिशय उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेचे प्राचार्य संजय भांडेकर यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी मध्ये शाळेचे उपप्राचार्य संजय शर्मा, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर थोरात तसेच शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री घोडे सर उपस्थित होते. सर्वप्रथम सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक श्री तुरुकमाने सर, श्री कटारे सर उप प्राचार्य श्री शर्मा सर, पर्यवेक्षक थोरात सर यांनी आपल्या भाषणामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जीवन चरित्राचा व भारतीय राज्यघटनेचा सविस्तर आढावा घेतला.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये भांडेकर सर यांनी राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखांकित करून राज्यघटना यशस्वी करायची असेल तर शासन, प्रशासन व सर्व नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून केवळ अधिकार मागण्यापेक्षा आपल्या कर्तव्याचे पालन करणे ही आपल्या सर्वांची आद्य जबाबदारी आहे,असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला शाळेचे सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका, शिक्षक,शिक्षिका, वर्ग नववीचे सर्व विद्यार्थी तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व उपस्थितांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.या कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन डी. एन. देशमुख सर यांनी पार पाडले.
भारत माध्यमिक शाळेत महामानवास अभिवादन
Dr. Babasaheb Ambedkar: रिसोडच्या भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी केली गेली, ज्यात शाळा स्टाफ आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
Dr. Babasaheb Ambedkar
संबंधित सामग्री
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!
Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...
रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली
Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य
रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू
Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.
उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा
Risod Taluka Water Scarcity: उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत
दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ
महाराष्ट्रातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेसाठी शुल्क माफी देण्यात आली आहे.