हिंगोली (Dr. Satish Vidolkar) : रविवार, १० मे रोजी पुण्यातील लक्ष्मीकांत पांडे यांच्या निवासस्थानी एका घरगुती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पंजाब विधानसभेत 'भारत विभूषण' या पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ. सतिश विडोळकर यांचा सपत्नीक गौरव यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमात यजमान लक्ष्मीकांत पांडे यांच्या मातोश्री, ८९ वर्षीय श्रीमती शांताबाई दिवाकरराव पांडे यांच्या हस्ते डॉ. विडोळकर (Dr. Satish Vidolkar) यांचा सपत्नीक सत्कार संपन्न झाला. हा सोहळा निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी महेश पासेकर, लक्ष्मण गोडसे मांगले, मेहता, अरविंद कुमुद, दिलीप नांदगांवकर, डॉ. नेहा बेलसरे, बेलसरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्वांनीच पंजाब विधानसभेत मिळालेल्या 'भारत विभूषण' पुरस्काराबद्दल डॉ. सतिश विडोळकर (Dr. Satish Vidolkar) यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.