Drunk Driver

परभणीत मद्यधुंद कार चालकाची दुचाकीला जोरदार धडक; पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

परभणी शहरातील जिंतूर रोडवरील कुंभकर्ण टाकळी शिवारातील आकाशवाणी परिसरात मद्यधुंद कार चालकाने कर्तव्य बजावून घरी परतणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली.

परभणीत मद्यधुंद कार चालकाची दुचाकीला जोरदार धडक; पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

परभणी : परभणी शहरातील जिंतूर रोडवरील कुंभकर्ण टाकळी शिवारातील आकाशवाणी परिसरात मद्यधुंद कार चालकाने कर्तव्य बजावून घरी परतणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या भीषण अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला असून पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर परभणीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव विकास विश्वनाथ खैरे (रा. कौसडी) असे असून ते परभणी पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत.

माहितीनुसार, शुक्रवार (दि. १७ जुलै) रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या दरम्यान ड्युटी पूर्ण करून विकास खैरे हे त्यांच्या होंडा युनिकॉर्न (एमएच २२ बीडी ६९६७) या दुचाकीवरून परभणीहून कौसडी गावाकडे निघाले होते.

याचवेळी मौजे टाकळी कुंभकर्ण येथून धर्मापुरीच्या दिशेने इको कार (एमएच २२ बीके २३३०) भरधाव वेगाने येत होती. या वाहनाचा चालक गजानन कदम (रा. धर्मापुरी) हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. दारूच्या नशेत वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने निष्काळजीपणे समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात पोलीस कर्मचारी विकास खैरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीच्या समोरील भागासह इंजिनचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला आहे.

दरम्यान, कारमधील एअरबॅग वेळेवर उघडल्यामुळे चालक गजानन कदम याला कोणतीही दुखापत झाली नाही. संबंधित इको कार त्याने अवघ्या महिनाभरापूर्वीच खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026