परभणीत हायवा डंपरने ८ विदयुत खांब व एक रोहित्र केला जमीन दोस्त

परभणीतील पूर्णा तालुक्यातील गौर येथे वाळूची वाहतूक करणाऱ्या एका डम्पर ने विजेचे ८ खांब व एक रोहित्र चक्क जमीनदोस्त केल्याची घटना गुरुवार २ एप्रिल रोजी पहाटे ५:३० च्या सुमारास घडली आहे.

परभणीत हायवा डंपरने ८ विदयुत खांब व एक रोहित्र केला जमीन दोस्त

Dumper Accident​​​​​​​

पहाटेची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला

परभणी (Dumper Accident) : परभणीतील पूर्णा तालुक्यातील गौर येथे वाळूची वाहतूक करणाऱ्या एका डम्पर ने विजेचे ८ खांब व एक रोहित्र चक्क जमीनदोस्त केल्याची घटना गुरुवार २ एप्रिल रोजी पहाटे ५:३० च्या सुमारास घडली आहे.

घटने बाबत सविस्तर माहिती अशी की वाळूची वाहतूक करणारा एक डम्पर पहाटे गौर येथे रेती टाकण्यासाठी आला होता. सदरील डंपरमध्ये असणारी रेती डंपरचालकाने एका बांधकामापाशी टाकून डम्पर रिकामाहीं केला.परंतु जाताना संबंधित डंपर चालकाने रेती टाकताना जो हायड्रा लावून उंच केलेली ट्राली पुन्हा जैसे थे ठिकाणी न आणता आहे त्या स्थितीतच डम्पर सुरु करून माघारी निघाला. यावेळी काही फूट अंतरावर येताच उच असणारा डम्पर चा पाठीमागिल भाग निर्धारित उंचीवर असणाऱ्या आवरण असणाऱ्या विद्युत केबल ला अडकल्या.यावेळी संबंधित डंपर चालकाने वेळीच वाहन  न थांबवता तसाच पुढे नेला यात नव्याने जोडण्यात आलेल्या आवरण असणाऱ्या विद्युत केबल न तुटल्याने संपूर्ण भार रस्त्या शेजारी असणाऱ्या विद्युत खांबावर पडला व काही क्षणातच एका मागे एक असे आठ विद्युत खांब अर्ध्यातून तुटून रस्त्यावर पडले व व त्यानंतर रस्त्या शेजारी असणारा विद्युत रोहित्र देखील जमीनी वर कोसळला. एवढे होऊनही संबंधित डंपर चालक पोबारा करण्याच्या तयारीत होता. यावेळी वेगाने आपले डंपर पुढे नेण्याच्या तयारीत असतांना आसपासच्या नागरिकांनी आरडाओरडा करून संबंधित डंपर थांबवला व त्यानंतर अडकलेली वायर काढून रस्ता सुरळीत करण्यात आला.

पूर्णेतील गौर येथील घटना 

 

पहाटेची वेळ असल्याने रस्त्यात शुकशुकाट असल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून चालकांने प्रसंगावधान राखत वेळीच वाहन थांबवले असते तर संबंधित घटना टळली असती .असं गावकरी बोलून दाखवत आहेत.आता संबंधित डंपर मालकाकडून नुकसान भरपाई पोटी विद्युत खांबाची दुरुस्ती करण्यास सुरूवात झाली असून रोहित्र उभारण्याचे काम देखील सुरू आहे.महावितरणअधिकारी कर्मचारी यांच्या देखरेखी खाली वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026