हिंगोलीकरांचा प्रवास होणार प्रदूषणमुक्त! आगारात ‘ई-शिवाई’ बसचे दिमाखात उद्घाटन; २१ पैकी ४ बसेस दाखल

हिंगोलीकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी आहे.

हिंगोलीकरांचा प्रवास होणार प्रदूषणमुक्त! आगारात ‘ई-शिवाई’ बसचे दिमाखात उद्घाटन; २१ पैकी ४ बसेस दाखल

E-Shivai Electric Buses

हिंगोली (E-Shivai Electric Buses) : हिंगोलीकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आधुनिक आणि पर्यावरणपूरक अशा ‘ई-शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, आज १ जून २०२६ रोजी हिंगोली आगारात या बसेसचे भव्य उद्घाटन करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यासाठी एकूण २१ ई-बसेस मंजूर झाल्या असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४ बसेस आगारात सुखरूप दाखल झाल्या आहेत.

या आधुनिक ई-शिवाई बसचे लोकार्पण जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. याप्रसंगी शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. आनंद बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोक धामणे, आगार व्यवस्थापक श्री. किशोर महाजन, स्थानकप्रमुख श्रीमती सुनिता गोरे आणि वाहतूक निरीक्षक श्री. फिरोज शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

दीड तासात चार्जिंग, ३०० किमीचा सुसाट प्रवास!
या ई-बसेसची वैशिष्ट्ये सांगताना आगार व्यवस्थापनाने माहिती दिली की, ही बस केवळ दीड तासात (१.५ तास) पूर्ण चार्ज होते. एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही बस तब्बल ३०० किलोमीटरपर्यंतचा प्रवास विनाखंड करू शकते. यामुळे प्रवाशांचा प्रवास गतिमान, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त होणार आहे.

या महत्त्वाच्या मार्गांवर धावणार बसेस
हिंगोली आगारातून या पहिल्या टप्प्यातील बसेस खालील प्रमुख मार्गांवर प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत :

  • हिंगोली ते छत्रपती संभाजीनगर
  • हिंगोली ते नांदेड
  • हिंगोली ते अकोला
  • हिंगोली ते परळी
  • हिंगोली ते रिसोड

या सोहळ्याला दिगंबर दराडे, सचिन पारीख, वैभव वरवंटे, मुकेश ठोंबरे यांच्यासह ‘ईव्ही ट्रान्स’ व ‘एसव्ही ट्रान्स’ कंपनीचे प्रतिनिधी श्री. कसबे, संकेत पवार, सिद्धेश्वर केंद्रे, श्री. वलेकर आणि चौधरी यांच्यासह आगार व वाहतूक विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“हिंगोली आगारात दाखल झालेल्या या ई-बसेसमुळे प्रवाशांना आधुनिक आणि आरामदायी सेवा मिळणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी या बसेस मैलाचा दगड ठरतील,” असा विश्वास याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नवीन ई-बस सुरू झाल्यामुळे हिंगोलीकरांमधून अत्यंत समाधान व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026