Education Quality

विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे!

शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी शिक्षकांनी भौतिक सुविधांपेक्षा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर भर देत बुलढाणा जिल्ह्याला देशातील टॉप ५ मध्ये नेण्याचे आवाहन केले.

विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे!

Education Quality

भौतिक सुविधांपेक्षा गुणवत्तावाढीवर भर देण्याचे शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांचे आवाहन

चिखली : विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता हीच शाळेच्या प्रगतीची खरी ओळख असून, शिक्षकांनी केवळ भौतिक सुविधांच्या मागे न धावता विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी अधिक प्रभावीपणे प्रयत्न करावेत. प्रशासन, पालक व लोकप्रतिनिधींचा शिक्षकांवरील विश्वास वाढला, तर अनावश्यक माहिती व अतिरिक्त उपक्रमांचा ताण कमी होईल, असे प्रतिपादन शिक्षण सहसंचालक (माध्यमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी केले.

बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र तथा शिक्षण सहसंचालक (माध्यमिक) डॉ. श्रीरामजी पानझाडे यांच्या जिल्ह्यातील शाळा भेट दौऱ्यानिमित्त विविध प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींच्या वतीने चिखली येथील श्री शिवाजी अध्यापक विद्यालयात त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी मा. भटकर साहेब, डायटचे प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी उमेशजी जैन, विस्तार अधिकारी, केंद्र समन्वयक तसेच विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद व नगरपरिषद मराठी शाळांमधील गुणवत्ता वाढ, शालेय प्रशासनासमोरील अडचणी तसेच प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित विविध समस्यांबाबत डॉ. पानझाडे यांना निवेदन सादर करण्यात आले. शिक्षकांच्या ऑनलाइन कामकाजाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, आगामी शालेय धोरण व कामकाज निश्चित करताना पुढील सहा महिन्यांत सर्व ऑनलाइन कामांमध्ये एकसूत्रीपणा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऑफलाइन पद्धतीने अनावश्यक माहिती मागविली जाणार नाही, याबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बुलढाणा जिल्ह्याला दरवर्षी भौतिक सुविधांसाठी शासनाकडून सुमारे १७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होतो. त्यामुळे शिक्षकांनी केवळ भौतिक सुविधांपेक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शिक्षकांनी आपसी समन्वयातून मार्ग काढत जिल्हास्तरीय पदोन्नतीचा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांचा आधार आवश्यक आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांचा आधार उपलब्ध नसल्यास मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र व पालकांच्या आधारकार्डाच्या आधारे पटसंख्या गणना करण्याबाबत सकारात्मक विचार करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती डॉ. पानझाडे यांनी दिली.

शालेय पोषण आहार व शालेय स्वच्छतेसंदर्भातील त्रयस्थ यंत्रणेमार्फत होणाऱ्या बाबी शासनस्तरावरील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पात्र शिक्षकांना नियमित निवड श्रेणीचा लाभ देताना अडचणी येत असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण संचालक कार्यालयाकडे सादर करावा, अशा सूचना त्यांनी गटशिक्षणाधिकारी उमेशजी जैन यांना दिल्या. सदर प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचेही निर्देश देण्यात आले.

मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्याबाबत मंत्री महोदयांनी सूचित केले असून, त्या अनुषंगाने शिक्षण विभागात कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्याला शैक्षणिक गुणवत्तेत देशातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी शिक्षकांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. यासाठी आवश्यक असलेल्या दहा महत्त्वपूर्ण बाबी प्रभावीपणे पूर्ण करण्याचे आवाहन डॉ. पानझाडे यांनी उपस्थित शिक्षकांना केले.

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या संवादात शालेय शिक्षणातील विविध अडचणी, शिक्षकांच्या समस्या, प्रशासनाचे कामकाज आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीच्या उपाययोजनांवर सखोल चर्चा झाली.

संबंधित सामग्री

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

Chikhli gangster Ishwar Dhanwate: शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाई सुरू ठेवली आहे. अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्या

Oct 06, 2026
बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शंकर भारसाकळे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी कर्ज आणि आर्थिक संकटाचा उल्लेख केल्याचे समोर आले.

Oct 03, 2026
सेवा संकल्प अभियानातून स्वच्छ चिखलीचा संदेश; माजी सैनिकांचा सन्मान

सेवा संकल्प अभियानातून स्वच्छ चिखलीचा संदेश; माजी सैनिकांचा सन्मान

Chikhli Seva Sankalp Mission: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवापर्वानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान

Oct 02, 2026
संच मान्यतेतील त्रुटी दूर करून अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया स्थगित करा

संच मान्यतेतील त्रुटी दूर करून अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया स्थगित करा

Vidarbha Junior College Teachers' Association: सत्र २०२५-२६ च्या संच मान्यतेमध्ये असलेल्या त्रुटी दुरुस्त करून, त्याआधारे सुरू करण्यात आलेली अतिरिक्त शिक्षक समायोजनाची प्रक्रिया तातडीने स्थगित करा...

Oct 01, 2026
मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाखांची मदत; वाढदिवसानिमित्त मुख्याधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाखांची मदत; वाढदिवसानिमित्त मुख्याधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

Chief Officer Prashant Bidkar: चिखली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीत १ लाख रुपयांची मदत जमा केली.

Oct 01, 2026