Educational Kit Distribution

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबत संस्कारांचीही पेरणी; भारत माध्यमिक शाळा, चिं.पेन येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

भारत माध्यमिक शाळा, चिं.पेन येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबत संस्कारांचीही पेरणी; भारत माध्यमिक शाळा, चिं.पेन येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

Educational Kit Distribution

रिसोड (Educational Kit Distribution) : विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यामध्ये चांगले संस्कार रुजावेत या उद्देशाने भारत माध्यमिक शाळा, चिं.पेन येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे आयोजन शिक्षक युवराज देशमुख यांनी केले. शाळेचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक विनोदराव देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

शिक्षक युवराज देशमुख हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असून, दरवर्षी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करून शिक्षणासाठी प्रोत्साहन देतात. मात्र, त्यांचे कार्य केवळ साहित्य वितरणापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या जीवनात मूल्यशिक्षण आणि सुसंस्कार रुजविण्यावरही त्यांचा विशेष भर आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी दररोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावून "शुभं करोति कल्याणम्" म्हणतात. तसेच सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी आई-वडिलांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेण्याची सवय त्यांनी अंगीकारली आहे. यासोबतच प्रत्येक विद्यार्थी नियमित वेळापत्रक तयार करून अभ्यास करत असून शिस्तबद्ध, संस्कारक्षम आणि जबाबदार विद्यार्थी बनण्याचा प्रयत्न करत आहे.

युवराज देशमुख यांचे मत आहे की, "केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर संस्कार, शिस्त, पालकांचा आदर आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी हेच विद्यार्थ्यांच्या यशाचे खरे आधारस्तंभ आहेत." या विचारातून ते विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.

या उपक्रमाबद्दल विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त करत युवराज देशमुख यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळण्याबरोबरच सुसंस्कारित, शिस्तप्रिय आणि जबाबदार नागरिक घडण्यास निश्चितच हातभार लागत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

Oct 06, 2026
रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.

Oct 05, 2026
उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

Risod Taluka Water Scarcity: उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत

Oct 04, 2026
दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क माफ

महाराष्ट्रातील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेसाठी शुल्क माफी देण्यात आली आहे.

Sep 30, 2026