Elderly Warkaris

पावसातही भक्तीचा ओघ अखंड; वयोवृद्ध वारकऱ्यांची घेतली विशेष काळजी

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसातही वारकऱ्यांची विठ्ठलनामाचा गजर करत पायी वाटचाल सुरूच होती.

पावसातही भक्तीचा ओघ अखंड; वयोवृद्ध वारकऱ्यांची घेतली विशेष काळजी

Elderly Warkaris

हिंगोली (Elderly Warkaris) : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे निघालेल्या दिंड्यांचा ओघ सुरूच असून, वाशिम जिल्ह्यातून विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेली श्री संत नामदेव महाराज दिंडी शुक्रवारी (३ जुलै) हिंगोली शहराजवळील नर्सी फाटा येथे दाखल झाली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसातही वारकऱ्यांची विठ्ठलनामाचा गजर करत पायी वाटचाल सुरूच होती.

नर्सी फाटा परिसरात दुपारपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने दिंडीतील वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांची गैरसोय होऊ नये, यासाठी दिंडीप्रमुखांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. रस्त्यावरून पायी चालणे कठीण झाल्याने ७० वर्षांवरील सुमारे २५ ते ३० वयोवृद्ध वारकऱ्यांना दिंडीसोबत असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉली आणि इतर वाहनांमध्ये सुरक्षितपणे बसविण्यात आले.

दुसरीकडे, तरुण वारकऱ्यांनी मात्र पावसाची पर्वा न करता टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल' या जयघोषात आपली पायी वाटचाल कायम ठेवली. प्रतिकूल हवामानातही त्यांच्या भक्तिभावात कोणतीही कमी दिसून आली नाही.

दिंडीतील सेवेकऱ्यांनी वारकऱ्यांसाठी तातडीने गरम चहा व फराळाची व्यवस्था केली. तसेच नर्सी फाटा परिसरातील स्थानिक नागरिकांनीही वारकऱ्यांना मोलाचे सहकार्य केले. काहींनी आपल्या दुकानांचे शेड उघडे करून दिले, तर काहींनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून सेवाभाव जपला.

पाऊस, ऊन किंवा वारा यांची पर्वा न करता विठ्ठल भेटीची आस मनात बाळगून वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. वाशिमहून निघालेली ही दिंडी येत्या चार दिवसांत पंढरपुरात दाखल होईल, असा विश्वास दिंडीचालकांनी व्यक्त केला. प्रतिकूल परिस्थितीतही एकमेकांना साथ देत, वयोवृद्धांची काळजी घेत पुढे जाण्याची वारकरी परंपरा पुन्हा एकदा या प्रवासातून अधोरेखित झाली.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026