रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे उसेगाव परिसरातील शेतकरी नेस्तनाबूत

 गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी व कुरखेडा तालुक्यांमध्ये रानटी हत्तींच्या कळपाने हैदोस मांडला असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचे काम सुरू आहे.

रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे उसेगाव परिसरातील शेतकरी नेस्तनाबूत

Elephant Attack

33 हत्तींचा कळप ठाण मांडून

गडचिरोली (Elephant Attack) : गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी व कुरखेडा तालुक्यात रानटी हत्तीच्या कळपाने हैदोस मांडला असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचे काम या हत्तीच्या कळपाने सुरू केले आहे. उभे पीक नेस्तनाबूत होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सध्या हत्तीचा कळप उसेगाव परिसरात ठाण मांडून असून उसेगाव येथील विमलबाई तुमरेटी, अल्का जीवन कुमोटी यांच्या शेतातील आंबा, पईप, ताळ या झाडांचे तसेच धान, मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. फळझाडे जगवण्यासाठी शेतकऱ्यांना 20 ते 25 वर्षे मेहनत घ्यावी लागते. मात्र रानटी हत्तींचा कळप एका दिवसात होत्याचे नव्हते करून सोडत आहे.

प्रतीक्षा जनार्धन ठुनेकार यांच्या धान शेतीचे तसेच विमल तुमरेटी, अल्का जीवन कुमोटी यांच्या मका पिकाचे मोठे नुकसान झाले. कृष्णाजी राऊत यांच्या शेतातील मिरची पीक या हत्तीच्या कळपाने पायदळी तुडवले.

झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सचिव मधुकर रेवाडे यांनी केली आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026