अमळनेर-धुळे हायवेवर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; तिहेरी धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू, साखरपुड्याचा आनंद शोकात बदलला

अमळनेर-धुळे महामार्गावरील मंगरूळ गावाजवळ सोमवारी सकाळी भीषण तिहेरी अपघात झाला.

अमळनेर-धुळे हायवेवर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; तिहेरी धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू, साखरपुड्याचा आनंद शोकात बदलला

Engagement Tragedy

अमळनेर (Engagement Tragedy) : अमळनेर-धुळे महामार्गावरील मंगरूळ गावाजवळ सोमवारी सकाळी भीषण तिहेरी अपघात झाला. कार, मोटरसायकल आणि एसटी बस यांच्यात झालेल्या या भीषण धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून संबंधित वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघात नेमका कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास मंगरूळ गावाजवळील हॉटेल वृंदावन परिसरात हा अपघात घडला. अमळनेरहून धुळ्याकडे जाणारी मोटरसायकल (क्रमांक MH-18 C-8719) आणि एसटी बस (क्रमांक MH-13 CU-7540) मार्गस्थ होत्या. त्याचवेळी धुळ्याकडून येणाऱ्या भरधाव कारने (क्रमांक GJ-19 AF-3147) चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या एसटी बस आणि मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला

या भीषण अपघातात मोटरसायकलचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून धरणगाव येथील मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, कारमधील पाच प्रवाशांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. हे सर्वजण गुजरातमधील व्यारा येथील एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळाली आहे. ते अमळनेर येथे आयोजित साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी येत होते. मात्र, नियतीने त्यांच्यावर दुर्दैवी घाला घातला.

मृतांची नावे

  • आदित्य चंद्रकांत महाजन
  • अनिता सुरेश महाजन
  • निर्मला नंदलाल महाजन
  • नंदलाल गोपाल महाजन
  • सुरेश विक्रम महाजन

लहान मुलाला मिळाले जीवदान

अपघातानंतर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. कारमध्ये अडकलेल्या एका लहान मुलाला स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत एसटी बसमधील दीपक दिलीप पाटील हे प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

​​​​​​​

पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणेची तत्परता

अपघाताची माहिती मिळताच '११२' आपत्कालीन सेवेच्या माध्यमातून पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, रवी पाटील तसेच पोलीस पाटील भागवत पाटील यांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतले. जखमींना '१०८' रुग्णवाहिकेच्या साहाय्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या भीषण अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

Mini Truck-Motorcycle Accident: शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिनीडोर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

Oct 05, 2026
वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसच्या धडकेत १६ वर्षीय रोहित कुदळेचा मृत्यू झाला. बहिण रिया गंभीर जखमी असून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.

Oct 01, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026