नागपुरात स्फोटकांचा साठा सापडला; माजी संचालकांच्या घरात खळबळ

नागपूर शहरात आज सकाळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, एका माजी संचालकाच्या घराच्या अंगणात मोठ्या प्रमाणात स्फोटके आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागपुरात स्फोटकांचा साठा सापडला; माजी संचालकांच्या घरात खळबळ

Explosives Found

घराच्या अंगणात जिलेटिन कांड्या आणि डेटोनेटर

नागपूर (Explosives Found) : नागपूर शहरात आज सकाळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, एका माजी संचालकाच्या घराच्या अंगणात मोठ्या प्रमाणात स्फोटके आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

गणेश पेठ परिसरातील डोसर भवनजवळील एका घराच्या अंगणात जिलेटिन कांड्या आणि जिवंत डेटोनेटर सापडल्याने खळबळ उडाली. ही स्फोटके जी.एस. कॉलेजचे माजी संचालक उज्ज्वल लांजेवार यांच्या निवासस्थानी आढळल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, आज सकाळी घरातील सदस्य अंगणात गेले असता त्यांना एक संशयास्पद बेवारस बॅग दिसली. बॅग उघडून पाहिल्यावर त्यात स्फोटकासारखी सामग्री असल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले.

सूचना मिळताच गणेश पेठ पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून परिसराचा ताबा घेतला आणि सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण भाग सील केला. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (BDDS) केलेल्या प्राथमिक तपासात १५ जिलेटिन कांड्या, ५८ डेटोनेटर आणि ८ कनेक्टर आढळून आले आहेत.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा करून तपास वेगाने करण्याच्या सूचना दिल्या. ही स्फोटके येथे कशी आली आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेणे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले असून, रात्री किंवा पहाटेच्या सुमारास कोणीतरी ही बॅग टाकून गेला का, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात दहशतवादी कटाचा कोणताही संबंध आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.

जिलेटिनचा वापर सामान्यतः खाणकाम किंवा विहिरी खोदण्यासाठी केला जातो. मात्र, शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भागात अशा प्रकारे स्फोटके सापडल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे एटीएसकडूनही समांतर तपास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तपास अधिक व्यापक करण्यासाठी ‘पेसो’ आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL)च्या तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. सापडलेली स्फोटके किती जुनी आहेत आणि त्यांची क्षमता किती आहे, याचा अभ्यास केला जात आहे.

गणेश पेठ परिसर हा बस आणि रेल्वे स्थानकाच्या जवळ असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. या घटनेची माहिती समजताच मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी आसपासची दुकाने तात्पुरती बंद करण्याचे आदेश दिले असून, नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026
‘निर्भयानंतर किती बदल झाला?’ दिल्ली-NCRमधील घटनांवर सुप्रीम कोर्टाचा गंभीर सवाल

‘निर्भयानंतर किती बदल झाला?’ दिल्ली-NCRमधील घटनांवर सुप्रीम कोर्टाचा गंभीर सवाल

दिल्ली-NCRमधील लैंगिक अत्याचारांच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाची सुओ मोटू दखल; सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेवर दिल्ली पोलिसांना सवाल.

Sep 28, 2026