Fake CBI Officers

'स्पेशल 26'ची अकोल्यात पुनरावृत्ती! बनावट CBI अधिकारी बनून व्यापाऱ्याकडून २५ लाखांची लूट; १२ तासांत आरोपी जेरबंद

अक्षय कुमारच्या 'स्पेशल 26' चित्रपटाची आठवण करून देणारी घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे.

'स्पेशल 26'ची अकोल्यात पुनरावृत्ती! बनावट CBI अधिकारी बनून व्यापाऱ्याकडून २५ लाखांची लूट; १२ तासांत आरोपी जेरबंद

Fake CBI Officers

५० सीसीटीव्हींच्या तपासातून पोलिसांना यश; संपूर्ण २५ लाखांची रोकड, दुचाकी आणि मोबाईलसह २७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोला (Fake CBI Officers) : अक्षय कुमारच्या 'स्पेशल 26' चित्रपटाची आठवण करून देणारी घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे. स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत दोन ठगांनी एका व्यापाऱ्याला लक्ष्य करत त्याच्याकडील तब्बल २५ लाख रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र, अकोला पोलिसांनी तातडीने तपास करत अवघ्या १२ तासांत दोन्ही आरोपींना अटक करून संपूर्ण रक्कम हस्तगत केली.

ही घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. खामगाव येथील एका मोठ्या व्यापाऱ्याला दोन तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी गाठून त्याच्याकडून २५ लाख रुपये लुटल्याची माहिती समोर आली. घटनेनंतर बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६८/२०२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्वतः या तपासात लक्ष घातले. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) तातडीने तपासाचे आदेश दिल्यानंतर विशेष पथके कार्यरत करण्यात आली.

पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेची तीन स्वतंत्र पथके तपासासाठी रवाना झाली. तपासादरम्यान खामगाव ते बाळापूर या मार्गावरील तब्बल ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांची ओळख निश्चित करण्यात पोलिसांना यश आले.

तपासात हार्दिक मनोजकुमार गुरबानी (वय २२) आणि साहिल नंदकिशोर नथ्थानी (वय २५), दोघेही रा. खामगाव, हेच बनावट सीबीआय अधिकारी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही खामगाव येथून अटक केली.

या कारवाईत आरोपींकडून व्यापाऱ्याकडून लुटलेले संपूर्ण २५ लाख रुपये रोख, १० हजार रुपये किमतीचा अँड्रॉइड मोबाईल, तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन दुचाकी आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. एकूण २७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा छडा लावून संपूर्ण रक्कम परत मिळविणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पथकासाठी २५ हजार रुपयांच्या रोख बक्षिसाची घोषणा केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास बाळापूर पोलीस करत असून, या तोतया अधिकाऱ्यांनी यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचाही तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे-राऊतांवर पलटवार; पुराव्याशिवाय आरोप होत असल्याचा दावा करत दिशा सालियन प्रकरणावरही सवाल.

Oct 02, 2026
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; कायदा-सुव्यवस्थेवर सवाल करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.

Sep 30, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026