Fake Currency Notes

अकोल्यात बनावट चलनी नोटांचे रॅकेट उध्वस्त; 97 हजारांच्या नकली नोटांसह तिघांना अटक

अकोल्यातील स्थानिक गुन्हे शाखेने बनावट भारतीय चलनी नोटांच्या अवैध रॅकेटवर मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.

अकोल्यात बनावट चलनी नोटांचे रॅकेट उध्वस्त; 97 हजारांच्या नकली नोटांसह तिघांना अटक

500 रुपयांच्या 194 बनावट नोटा जप्त; डोणगावपर्यंत पोहोचले तपासाचे धागेदोरे, रॅकेटमागील सूत्रधारांचा शोध सुरू

अकोला : अकोल्यातील स्थानिक गुन्हे शाखेने बनावट भारतीय चलनी नोटांच्या अवैध रॅकेटवर मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान 500 रुपयांच्या एकूण 194 बनावट नोटा, म्हणजेच 97 हजार रुपयांच्या नकली चलनी नोटा जप्त करण्यात आल्या असून, या प्रकरणाचा तपास आता अधिक व्यापक करण्यात आला आहे.

17 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, गुडधी येथील चंदन भिमराव घांडोरे हा बनावट नोटा खऱ्या चलनी नोटांप्रमाणे बाजारात वापरण्याच्या तयारीत आहे. ही माहिती तत्काळ पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करून कारवाईचे नियोजन करण्यात आले.

यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुडधी परिसरातील आलीयाबाद रोड येथे सापळा रचून चंदन घांडोरे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता 500 रुपयांच्या 21 बनावट नोटा आढळून आल्या. पंचांसमक्ष तपासणी केल्यानंतर त्या भारतीय चलनातील बनावट नोटा असल्याचे स्पष्ट झाले.

चौकशीतून उलगडले संपूर्ण रॅकेट

प्राथमिक चौकशीत चंदन घांडोरे याने या बनावट नोटा मुर्तीजापूर येथील जहीरोद्दीन जबिरोद्दीन याच्याकडून मिळाल्याची कबुली दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने मुर्तीजापूरला रवाना झाले. आसरा फाटा परिसरात सापळा रचून जहीरोद्दीनला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून 500 रुपयांच्या 173 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.

पुढील चौकशीत जहीरोद्दीनने या नोटा गुडधी येथील विठ्ठल संजय वारोकार याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी विठ्ठल वारोकार यालाही ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत डोणगाव, जिल्हा बुलडाणा येथील एका व्यक्तीकडून या बनावट नोटा आणल्याची माहिती समोर आली. आरोपी या नोटा बाजारात खऱ्या चलनी नोटांप्रमाणे वापरण्याच्या प्रयत्नात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

बनावट नोटा कुठे छापल्या? तपास सुरू

या प्रकरणी चंदन भिमराव घांडोरे, जहीरोद्दीन जबिरोद्दीन आणि विठ्ठल संजय वारोकार या तिघांविरुद्ध सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 180 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, बनावट नोटा नेमक्या कुठे छापल्या जात होत्या तसेच त्या राज्यातील इतर भागातही पुरवल्या गेल्या होत्या का, याचा आता पोलीस सखोल तपास करत आहेत.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या धडक कारवाईमुळे बनावट चलनी नोटांच्या अवैध रॅकेटला मोठा धक्का बसला असून आर्थिक फसवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

संबंधित सामग्री

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा संताप; ‘कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या’ उडाल्याचा आरोप

ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; कायदा-सुव्यवस्थेवर सवाल करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.

Sep 30, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026