Fake Number Plate

दंड टाळण्यासाठी दुसऱ्या कारचा नंबर स्वतःच्या कारला लावणे पडले महागात

वाहतूक दंड टाळण्यासाठी दुसऱ्या कारचा नोंदणी क्रमांक स्वतःच्या कारवर लावून वापरणे एका कारचालकाला चांगलेच महागात पडले.

दंड टाळण्यासाठी दुसऱ्या कारचा नंबर स्वतःच्या कारला लावणे पडले महागात

Fake Number Plate

एकावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

औंढा नागनाथ (Fake Number Plate) : वाहतूक दंड टाळण्यासाठी दुसऱ्या कारचा नोंदणी क्रमांक स्वतःच्या कारवर लावून वापरणे एका कारचालकाला चांगलेच महागात पडले. दोन्ही वाहनांचा एकच नोंदणी क्रमांक आढळून आल्याने बनावट नंबर प्लेट वापरणाऱ्या असोला येथील एका व्यक्तीविरुद्ध २६ जून रोजी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असोला येथील प्रमोद मुरलीधर कपाटे यांनी आदिनाथ रंगनाथ काळे (रा. आजरसोंडा) यांच्या मालकीच्या स्विफ्ट डिझायर (एमएच १२ क्यूजी ६३१०) या वाहनाचा नोंदणी क्रमांक स्वतःच्या स्विफ्ट डिझायर कारवर लावला होता. स्वतःच्या वाहनावर वाहतूक दंड लागू नये, स्वतःचा फायदा व्हावा तसेच शासनाची फसवणूक व्हावी या उद्देशाने त्यांनी हा प्रकार केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, नांदेड येथे संबंधित वाहनावर वाहतूक दंड आकारण्यात आला. मात्र तो दंड आदिनाथ काळे यांच्या वाहनावर नोंद झाला. त्यावेळी त्यांचे वाहन पुण्यात असल्याने त्यांनी याबाबत चौकशी केली असता त्यांच्या वाहनाचा क्रमांक दुसऱ्या कारवर वापरला जात असल्याचे समोर आले.

यानंतर त्यांनी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे व वाहतूक पोलीस वसंत चव्हाण यांनी तपास करून असोला येथे संबंधित कार शोधून काढली. दोन्ही वाहने ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली.

वाहतूक पोलीस वसंत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून प्रमोद मुरलीधर कपाटे (रा. असोला, ता. औंढा नागनाथ) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

आसोला खुर्द येथे भीषण पाणीटंचाई; तलावातील अनधिकृत मोटार पंप काढण्याची मागणी!

आसोला खुर्द येथे भीषण पाणीटंचाई; तलावातील अनधिकृत मोटार पंप काढण्याची मागणी!

Asola Khurd water shortage: मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथे सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गावातील दोन्ही तलाव आणि कारपा व आसोला खुर्द शिवार

Oct 05, 2026
अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026