आखाडा बाळापूर बाजार समितीत दिड कोटी निधीतून साकारणार शेतकरी भवन

आखाडा बाळापूर येथील बाजार समितीत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ‘शेतकरी भवन’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

आखाडा बाळापूर बाजार समितीत  दिड कोटी निधीतून साकारणार शेतकरी भवन

Farmer Bhavan Project

आखाडा बाळापूर बाजार समितीत शेतकरी भवन उभारणीला हिरवा कंदील

आखाडा बाळापूर (Farmer Bhavan Project) : येथील बाजार समितीत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ‘शेतकरी भवन’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती बाजार समितीचे सभापती दत्ता संजय बोंढारे यांनी दिली.

राज्य शासनाच्या ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ योजनेअंतर्गत या इमारतीच्या बांधकामासाठी १ कोटी ५२ लाख ९१ हजार ९७० रुपयांच्या अंदाजपत्रकास सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने २३ एप्रिल रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणतात. मात्र, लांबच्या अंतरामुळे किंवा व्यवहारात होणाऱ्या विलंबामुळे त्यांना अनेकदा मुक्काम करावा लागतो. अशा वेळी निवास व मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना विशेषतः पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर, ज्या बाजार समित्यांमध्ये अशा सुविधा उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी प्राधान्याने शेतकरी भवन उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

आखाडा बाळापूर बाजार समितीने सादर केलेल्या प्रस्तावाची तांत्रिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यास मान्यता मिळाली असून, लवकरच प्रत्यक्ष बांधकाम प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

माजी सभापती संजय पाटील बोंढारे तसेच आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक मंडळाच्या सहकार्याने हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या योजनेमुळे बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या सुमारे १२० गावांतील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकरी भवनासोबतच शेतकरी हितासाठी विविध उपक्रम आणि योजना राबविण्याचाही मानस असल्याचे सभापती दत्ता पाटील बोंढारे यांनी सांगितले.

संबंधित सामग्री

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या e-KYC साठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क नाही..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या e-KYC साठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क नाही..

Farm Loan Waiver Scheme: ही सेवा पूर्णतः विनामूल्य असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Jul 28, 2026
आखाडा बाळापूर ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपन्न

आखाडा बाळापूर ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपन्न

ग्रामपंचायत सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम १२ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित विशेष ग्रामसभेत पार पडला.

Jun 12, 2026
ग्रामपंचायत वाईगौळ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित!

ग्रामपंचायत वाईगौळ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित!

मानोरा तालुक्यातील वाईगौळ ग्रामपंचायतने महाआवास अभियान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण २०२३-२४ अंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून तृतीय क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळवला आहे.

May 18, 2026
‘प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना’मुळे ग्रामीण विकासाला नवी गती

‘प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना’मुळे ग्रामीण विकासाला नवी गती

ग्रामीण भारतातील सामाजिक आणि आर्थिक विषमता कमी करण्यासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना (PMAGY) प्रभावी ठरत आहे.

Apr 22, 2026
 चिखली तहसील कार्यालयामार्फत 'समाधान शिबिराचे' आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

 चिखली तहसील कार्यालयामार्फत 'समाधान शिबिराचे' आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

सर्वसामान्यांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सुटावेत आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा, या उद्देशाने चिखली तहसील कार्यालयाच्या वतीने विशेष 'समाधान शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे.

Apr 09, 2026