FDA Maharashtra

अंबाजोगाईतील चायनीज सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; परवान्याअभावी दुकान सील

राज्यात भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधातील अन्न व औषध प्रशासनाची मोहीम अधिक तीव्र झाली आहे.

अंबाजोगाईतील चायनीज सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; परवान्याअभावी दुकान सील

FDA Maharashtra

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेची कारवाई सुरूच; अस्वच्छता व नियमभंगामुळे नमुने जप्त, प्रयोगशाळा अहवालानंतर पुढील कारवाई

राज्यात भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधातील अन्न व औषध प्रशासनाची मोहीम अधिक तीव्र झाली आहे. नामांकित हॉटेलांपासून ते रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांपर्यंत कारवाईचा धडाका सुरू असतानाच आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एका चायनीज सेंटरवर प्रशासनाने धाड टाकून आस्थापना बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई शहरातील बाजार परिसरात असलेल्या तवक्कल चायनीज सेंटरची सोमवारी अन्न व औषध प्रशासनाने तपासणी केली. अन्न सुरक्षा अधिकारी अ. दि. नरवाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ही कारवाई केली. तपासणीदरम्यान संबंधित आस्थापनामध्ये अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले.

चौकशीत संबंधित चायनीज सेंटर कोणताही आवश्यक परवाना न घेता सुरू असल्याचे स्पष्ट झाले. तसेच स्वयंपाकघर आणि खाद्यपदार्थ तयार करण्याच्या जागेतील अस्वच्छता व स्वच्छतेच्या निकषांचे पालन न झाल्याचे आढळल्याने अधिकाऱ्यांनी तातडीची कारवाई करत आस्थापना बंद करण्याचे आदेश दिले.

कारवाईदरम्यान खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालासह इतर अन्नपदार्थांचे नमुने जप्त करण्यात आले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत आवश्यक परवाना मिळेपर्यंत हे चायनीज सेंटर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, आदेशाचे उल्लंघन झाल्यास कठोर दंडात्मक कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

अंबाजोगाई आणि केज परिसरात अस्वच्छ व निकृष्ट दर्जाचे अन्न विक्रीबाबत प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर ही धाड टाकण्यात आली. कारवाईची माहिती परिसरात पसरताच बाजारातील अनेक हॉटेल्स आणि मांसविक्रीची दुकाने घाईघाईने बंद करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसून, अन्न व औषध प्रशासनाची तपासणी मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित सामग्री

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPचे शिवाजी पार्कात आंदोलन; तुकाराम मुंढेंना मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी, तरुणांचा मोठा सहभाग.

Oct 02, 2026
मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली; धरणांमध्ये फक्त 43.66% पाणीसाठा, अनेक प्रकल्प आटण्याच्या मार्गावर

मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली; धरणांमध्ये फक्त 43.66% पाणीसाठा, अनेक प्रकल्प आटण्याच्या मार्गावर

मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 43.66% पाणीसाठा शिल्लक. सिद्धेश्वर, सीना-कोळेगाव शून्यावर; जायकवाडी 77.08% तर मांजरा 10% वर.

Oct 02, 2026
FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; संजय राऊतांच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर.

Sep 29, 2026