अनाधिकृत खत विक्री प्रकरणात २०.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

अनाधिकृत खत विक्रीविरोधात कृषी विभागाने मोठी कारवाई करत संशयास्पद जिप्सम पावडरच्या ५०० गोण्या व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण २० लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अनाधिकृत खत विक्री प्रकरणात २०.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

Fertilizer Scam

मसोड येथे संशयास्पद जिप्सम पावडरच्या ५०० गोण्या जप्त; कृषी विभागाची कामगिरी

कळमनुरी (Fertilizer Scam) : कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे अनाधिकृत खत विक्रीविरोधात कृषी विभागाने मोठी कारवाई करत संशयास्पद जिप्सम पावडरच्या ५०० गोण्या व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण २० लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात खत नियंत्रण आदेश १९८५ व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कळमनुरी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१६ मे रोजी प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार मसोड येथे उभ्या असलेल्या एका ट्रकची कृषी विभागाच्या पथकाने कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये ‘आर्य केमिकल्स अँड मिनरल इंडस्ट्रीज, नागोर (राजस्थान)’ यांचे बिल असलेली संशयास्पद जिप्सम पावडर आढळून आली. सदर ट्रकमधून ४० किलो वजनाच्या एकूण ५०० गोण्या जप्त करण्यात आल्या.

जप्त करण्यात आलेल्या संशयास्पद खताचे नमुने घेऊन ते शासकीय खत तपासणी प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, प्राप्त निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

या कारवाईत कृषी विकास अधिकारी अतुल वायसे, तालुका कृषी अधिकारी के. एम. जाधव, गुणवत्ता नियंत्रणचे कृषी अधिकारी लक्ष्मण काळे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी पंकज राठोड, गुणवत्ता नियंत्रणचे कृषी अधिकारी समीर वाळके व वसमत पंचायत समितीचे कृषी अधिकारी रामेश्वर गवळी यांनी सहभाग घेतला.

पथकाने ५०० बॅगा संशयास्पद जिप्सम पावडर तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक क्रमांक आरजे ०७ जीडी ७०९५ हा १८ चाकी ट्रक जप्त केला आहे. या प्रकरणात राम रतन सहीराम (रा. सियागो का मोहल्ला, स्वरूपदेसार, ता. जि. बिकानेर, राजस्थान) आणि सुंदर परता राम (रा. स्वरूपदेसार, ता. जि. बिकानेर) यांच्याविरुद्ध कळमनुरी गुणवत्ता नियंत्रणचे कृषी अधिकारी समीर वाळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत. ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक महेशकुमार तीर्थकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रविण देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, तंत्र अधिकारी बालाजी मुंडे, विभागीय कृषी अधिकारी अशोक तिडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

संबंधित सामग्री

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

Hingoli Rural Police Action: शहरातील अकोला बायपास परिसरातील दुकानासमोर उभा केलेला सुमारे आठ लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस

Oct 02, 2026