सक्षम प्राधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव केल्यास ६२०० कुटुंबांना न्याय मिळणार!

 दिग्रस येथील बहुचर्चित जनसंघर्ष अर्बनमधील ४९ कोटींच्या अपहार प्रकरणात अखेर ४ मे रोजी गृह विभागाने अधिसूचना जारी केली आहे.

सक्षम प्राधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव केल्यास ६२०० कुटुंबांना न्याय मिळणार!

Financial Fraud Case

जनसंघर्ष अर्बन निधीच्या आरोपींची मालमत्ता होणार जप्त

मानोरा (Financial Fraud Case) : दिग्रस येथील बहुचर्चित जनसंघर्ष अर्बनमधील ४९ कोटींच्या अपहार प्रकरणात अखेर ४ मे रोजी गृह विभागाने अधिसूचना जारी केली आहे. मुख्य आरोपी प्रणित देवानंद मोरेसह इतर आरोपींची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त केली जाणार आहे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या मालमत्तेचा त्वरित लिलाव केल्यास ६ हजार २०० खातेदारांना न्याय मिळणार आहे.

जनसंघर्ष अर्बनच्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, दारव्हा, नेर, आर्णी, मानोरा आणि कारंजा येथे शाखा उघडण्यात आल्या होत्या. त्यानंतर ठेवीदारांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारण्यात आल्या. मात्र मुदतपूर्तीनंतर ठेवी परत करण्यात कसूर केल्याने आरोपींविरुद्ध दिग्रस पोलिस ठाण्यात २०२४ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिसूचना निघाली, ठेवीदारांना पैसे परत मिळण्याची आशा पल्लवित

वित्तीय संस्था ठेवीदारांना पैसे परत करण्याची शक्यता नसल्याने मालमत्ता जप्त करून नियंत्रण ठेवण्यासाठी पुसद उपविभागीय अधिकाऱ्यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जनसंघर्ष अर्बन म्युच्युअल बेनिफिट लि., जनसंघर्ष अर्बन निधी लि., जनसंघर्ष अर्बन नेर निधी लि. आणि जनसंघर्ष एंटरप्रायजेस प्रा. लि. या संस्थांचे संचालक, व्यवस्थापक, प्रवर्तक, भागीदार, कर्मचारी व संबंधित व्यक्तींच्या मालमत्तेचा तपशील आदेशात नमूद करण्यात आला आहे.

अधिसूचनेनुसार आरोपी प्रणित मोरेकडे चार प्लॉट, एक बांधलेले घर, एक राहते घर व ०.३८ हेक्टर शेतजमीन आहे. देवानंद मोरेकडे एक बांधलेले घर, एक प्लॉट व ०.८२ हेक्टर जमीन आहे. प्रीतम मोरेकडे एक दुमजली घर आहे. आलमगिर जहागीर खानकडे दोन दुकान गाळे व एक घर, मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन येथे प्लॉट, नूर महमद खान गुलाब खानकडे दोन प्लॉट, शिवानी प्रितम मोरेच्या नावे ०.२३ हेक्टर जमीन, मेहमूद खान जहागीर खानकडे एक प्लॉट, मोहम्मद अदनान मोहम्मद सादीक परसुवाले यांच्याकडे एक प्लॉट आणि पवन मोरेकडे एक प्लॉट अशी स्थावर मालमत्ता नोंदविण्यात आली आहे.

याशिवाय जनसंघर्ष अर्बन म्युच्युअल बेनिफिट लि.ची विविध बँकांमध्ये एकूण १२ खाती आहेत. आरोपी प्रणित मोरे, साहील जयस्वाल, प्रीतम मोरे, जयश्री मोरे, अनिल जयस्वाल व इतरांच्या नावावरही विविध बँक खाती आहेत. ठेवीदारांच्या रकमेतून चालविलेल्या पेट्रोलपंपसह अनेक आर्थिक व्यवहारांचा तपशील समोर आला आहे.

जंगम मालमत्तेत विविध चारचाकी व दुचाकी वाहनांचा समावेश आहे. सौरव मोरे, साहील जयस्वाल, सय्यद शहबाज, प्रणित मोरे, प्रीतम मोरे, सुमित गायकवाड आणि पवन मोरे यांच्या नावावर वाहने नोंदवली आहेत.

आजपर्यंत अनेक वित्तीय संस्थांमध्ये अपहाराची प्रकरणे उघड झाली असली, तरी बहुतांश प्रकरणांमध्ये एमपीआयडी अॅक्टअंतर्गत गुन्हे दाखल असूनही अधिसूचना प्रसिद्ध झाल्या नव्हत्या. मात्र जनसंघर्ष प्रकरणात जारी झालेली अधिसूचना ही इतिहासातील पहिलीच असल्याचे मानले जात आहे.

संबंधित सामग्री

लाचखोरी प्रकरणात मोठा खुलासा; अकोल्याच्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ३ कोटींचे घबाड जप्त

लाचखोरी प्रकरणात मोठा खुलासा; अकोल्याच्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ३ कोटींचे घबाड जप्त

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Jul 03, 2026
जवळा बाजार येथे मोबाईल टॉवर केबल चोरीचा डाव उधळला; चौघांना अटक

जवळा बाजार येथे मोबाईल टॉवर केबल चोरीचा डाव उधळला; चौघांना अटक

मोबाईल टॉवरच्या केबल चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चौघा आरोपींना जवळा बाजार पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले असून या कारवाईत 95,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Jun 02, 2026
जनसंघर्ष प्रकरणात १६ एप्रिल रोजी सुनावणी! 

जनसंघर्ष प्रकरणात १६ एप्रिल रोजी सुनावणी! 

दिग्रस येथील बहुचर्चित जनसंघर्ष अर्बन निधीत ४९ कोटी ६९ लाख अपहार करणाऱ्या मास्टर माइंड प्रणीत मोरे याने खातेदारांच्या ठेवीतून अनेक गैरव्यवहार केले आहेत.

Apr 11, 2026