चाकूर दागिने लंपास

चाकूचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील एक लाख तीस हजाराचे दागिने लंपास

Chakur Jewelry stolen:

चाकूचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील एक लाख तीस हजाराचे दागिने लंपास

Chakur Jewelry stolen

चाकूर (Chakur Jewelry stolen) : लातूर जिल्ह्य़ातील चाकूर येथे घरासमोर अंगणात साफसफाई करत असलेल्या महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चाकूचा धाक दाखवून तीन अनोळखी व्यक्तींनी जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना रविवारी (दि. २३) पहाटेच्या सुमारास चाकूर शहरातील बोथी रोड परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी अज्ञात तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

कल्पना नंदकुमार आक्कानवरु (वय ५०, रा. बोथी रोड, पोस्ट ऑफिसजवळ, चाकूर) या रविवारी पहाटे सुमारे ५.२६ वाजता आपल्या घरासमोरील अंगणात झाडून काढत होत्या. त्यावेळी विनानंबर प्लेटच्या युनिकॉर्न मोटारसायकलवरून तीन अनोळखी इसम तेथे आले. तिघांनी संगनमत करून चाकूचा धाक दाखवत (Chakur Jewelry stolen) त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले आणि मोटारसायकलवरून पसार झाले.

या (Chakur Jewelry stolen) घटनेत महिलेच्या गळ्यातील सुमारे एक तोळा वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, कानातील सुमारे एक तोळा दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या साखळ्या, फुले व सरपाळे तसेच पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण अंदाजे १ लाख ३० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला आहे.

घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन या घटनेचा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस उपनिरीक्षक आर. टी. चव्हाण हे अधिक तपास करत असून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे फिरविण्यात येत आहेत. आरोपींची ओळख अद्याप पटलेली नसून चोरीस गेलेला ऐवजही मिळालेला नाही.

संबंधित सामग्री

रिंग रोडवरील खून प्रकरणात दोघांना अटक; जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

रिंग रोडवरील खून प्रकरणात दोघांना अटक; जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

Latur murder case: बाभळगाव नाक्याकडे जाणाऱ्या रिंग रोडवरील यशोदिप हायड्रोलिक दुकानासमोर झालेल्या मारहाणीत जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या किरण कालिदास सगर याच्या खून प्रकरण

Aug 30, 2026
लाचखोरी प्रकरणात मोठा खुलासा; अकोल्याच्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ३ कोटींचे घबाड जप्त

लाचखोरी प्रकरणात मोठा खुलासा; अकोल्याच्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ३ कोटींचे घबाड जप्त

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Jul 03, 2026
दारू अड्ड्यावर छापा; पोलिस कर्मचाऱ्यावर गुप्तीने हल्ला, तीघाविरुद्ध गुन्हा

दारू अड्ड्यावर छापा; पोलिस कर्मचाऱ्यावर गुप्तीने हल्ला, तीघाविरुद्ध गुन्हा

Liquor Store Raid: वाई शिवारातील छापा मधील घटनेत पोलिस कर्मचारीवर गुप्तीने हल्ला झाला. गुप्तीने जमादार सतीष जाधव यांच्यावर वार केला आणि एक कर्मचारी जखमी झाला.

Jun 02, 2026
जवळा बाजार येथे मोबाईल टॉवर केबल चोरीचा डाव उधळला; चौघांना अटक

जवळा बाजार येथे मोबाईल टॉवर केबल चोरीचा डाव उधळला; चौघांना अटक

मोबाईल टॉवरच्या केबल चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चौघा आरोपींना जवळा बाजार पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले असून या कारवाईत 95,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Jun 02, 2026
सक्षम प्राधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव केल्यास ६२०० कुटुंबांना न्याय मिळणार!

सक्षम प्राधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव केल्यास ६२०० कुटुंबांना न्याय मिळणार!

 दिग्रस येथील बहुचर्चित जनसंघर्ष अर्बनमधील ४९ कोटींच्या अपहार प्रकरणात अखेर ४ मे रोजी गृह विभागाने अधिसूचना जारी केली आहे.

May 07, 2026