Food Adulteration

चिखली शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही!

चिखली शहरासह जिल्ह्यातील विविध स्वीटमार्ट्समध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाची मिठाई विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

चिखली शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही!

Food Adulteration

अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे कडक कारवाईची मागणी

चिखली : चिखली शहरासह जिल्ह्यातील विविध स्वीटमार्ट्समध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाची मिठाई विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, अत्यंत स्वस्त आणि निकृष्ट दर्जाच्या 'अहमदाबादी बर्फी'पासून बनवलेला पेढा ग्राहकांना शुद्ध 'मलाई पेढा' असल्याचे भासवून चढ्या दराने विकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही ग्राहकांची उघड फसवणूक असून, नफेखोरीच्या उद्देशाने काही स्वीटमार्ट चालकांकडून नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, ग्राहकांना कोणत्याही खरेदीचे पक्के बिल दिले जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

चिखली शहरात रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार करण्यात आलेला बनावट खवा व इतर बनावट अन्नपदार्थांची विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने १५ जुलै २०२६ रोजी बुलढाण्याचे माननीय जिल्हाधिकारी तसेच अन्न व औषध प्रशासनाचे माननीय सहआयुक्त श्री. पाटील यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

प्रमुख मागण्या

संघटनेने निवेदनाद्वारे चिखली शहरात रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार करण्यात आलेला बनावट खवा व इतर घातक अन्नपदार्थांची विक्री सर्रास सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, भेसळयुक्त व बोगस खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या मोठ्या स्वीटमार्ट्सवर तातडीने धाडी टाकण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

या गंभीर विषयावर सहआयुक्त श्री. पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून, प्रशासनाकडून या प्रकरणी तातडीने कडक कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे संघटनेने सांगितले.

आयुक्तांकडे ई-मेलद्वारे तक्रार

याच संदर्भात, राज्यभरात अन्न भेसळ प्रतिबंधासाठी 'ॲक्शन मोड'वर असलेले अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्री. तुकाराम मुंडे यांनाही ई-मेलद्वारे अधिकृत तक्रार पाठविण्यात आली असून, या कथित रॅकेटचा पर्दाफाश करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

"नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही," असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. आता या प्रकरणात प्रशासन प्रत्यक्षात कोणती कारवाई करते, याकडे चिखलीकरांचे लक्ष लागले आहे.

टीप : वरील वृत्तातील आरोप संबंधित संघटना व निवेदनातील माहितीनुसार आहेत. याबाबत संबंधित प्रशासनाची अधिकृत कारवाई अथवा संबंधित पक्षाची भूमिका समोर आल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

संबंधित सामग्री

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

Chikhli gangster Ishwar Dhanwate: शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाई सुरू ठेवली आहे. अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्या

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याचा मृत्यू; ‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटलं नाही’

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शंकर भारसाकळे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी कर्ज आणि आर्थिक संकटाचा उल्लेख केल्याचे समोर आले.

Oct 03, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026