Ganja Cultivation

करडखेलच्या शेतात गांजाची लागवड; ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

करडखेल (ता. उदगीर) येथील एका शेतात अवैधरीत्या गांजाची लागवड करून तो विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा प्रकार उदगीर ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला.

करडखेलच्या शेतात गांजाची लागवड; ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

उदगीर ग्रामीण पोलिसांची कारवाई; १३७ ओल्या गांजाच्या रोपट्यांसह ३७० ग्रॅम सुका गांजा हस्तगत

उदगीर : करडखेल (ता. उदगीर) येथील एका शेतात अवैधरीत्या गांजाची लागवड करून तो विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा प्रकार उदगीर ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी १३७ गांजाची रोपटे तसेच ३७० ग्रॅम सुका गांजा, असा एकूण १ किलो १९० ग्रॅम गांजा, अंदाजे ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अंगद हरीबा भंडारे (वय ४८, रा. करडखेल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२.५० वाजता करडखेल येथील आरोपीच्या शेतात ही कारवाई करण्यात आली. शेतात हिरवट रंगाची, उग्र वासाची १३७ ओल्या गांजाची रोपटे आढळून आली. त्यांचे वजन ८२० ग्रॅम असून किंमत अंदाजे ४१ हजार रुपये आहे. तसेच पाने व बोंडे असलेला ३७० ग्रॅम सुका गांजा, अंदाजे १८ हजार ५०० रुपये किमतीचा, पोलिसांना मिळून आला.

आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजाची अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने शेतात गांजाची लागवड करून तो बाळगल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(अ)(१), २०(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याची नोंद रात्री ८.१४ वाजता करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बेंबडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप गाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोळे, पोलीस उपनिरीक्षक काळे तसेच उदगीर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने केली.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
“ई-कार्डचा बिघाड अन् वृद्धांवर संतापाचा उद्रेक; एसटी वाहकाच्या शिवीगाळीचा आरोप!”

“ई-कार्डचा बिघाड अन् वृद्धांवर संतापाचा उद्रेक; एसटी वाहकाच्या शिवीगाळीचा आरोप!”

Udgir ST E-Card: ई-कार्ड मशीन बंद असल्याच्या कारणावरून उदगीर-अहमदपूर एसटी बसमध्ये प्रवासी आणि वाहकात झालेला वाद चांगलाच पेटल्याचा आरोप आहे. या वादात वाहकाने प्रवाशांना तसेच त्यांच्या आई-बहिणींविषयी

Oct 05, 2026
उदगीरच्या दूध डेअरीला ‘हिरवा कंदील’; दुसऱ्या धवलक्रांतीचा मार्ग मोकळा!

उदगीरच्या दूध डेअरीला ‘हिरवा कंदील’; दुसऱ्या धवलक्रांतीचा मार्ग मोकळा!

Udgir's milk dairy: वर्षानुवर्षे बंद असलेल्या उदगीरच्या शासकीय दूध डेअरीच्या पुनरुज्जीवनाला अखेर महत्त्वाचे वळण मिळाले आहे. उदगीर येथील शासकीय दूध डेअरीच्या अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल

Oct 05, 2026
अवैध सावकारीच्या संशयावरून उदगीरमध्ये छापा; कोरे बाँड, कोरे चेकसह हिशोबाच्या वह्या जप्त

अवैध सावकारीच्या संशयावरून उदगीरमध्ये छापा; कोरे बाँड, कोरे चेकसह हिशोबाच्या वह्या जप्त

Udgir Illegal Money Lending: उदगीर तालुक्यातील कथित विनापरवाना अवैध सावकारी व्यवहाराच्या तक्रारीची दखल घेत सहकार विभागाने सोमवारी (५ ऑक्टोबर) मोठी कारवाई केली. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026