घोट येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
घोट (Dr. Babasaheb Ambedkar) : विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने स्थानिक घोट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या नियोजीत जागेत आमदार देवराव होळी यांच्या स्थानिक विकास निधितुन 10 लाख रुपयाचे सामाजिक सभागृहाचे फित कापुन उद्घाटन प्रदेशाध्यक्ष भाजपा आदिवासी मोर्चा तथा माजी आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सर्वप्रथम माजी आ.डॉ. होळी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृती स्मारकाला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले तसेच भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.
यानंतर माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या स्थानिक विकास निधीतून देण्यात आलेल्या नियोजीत जागेमध्ये सामाजीक सभागृहाचे उद्घघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजपा जिल्हा बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शाहा,विलास उईके,स्मारक समीतीचे अध्यक्ष विशाल दहीवले, उपाध्यक्ष गोकुळदास वाकडे,सचिव प्रदीप वाकडे घोट तमुंसचे अध्यक्ष दिनकर लाकडे,पत्रकार हेमंत उपाध्ये,प्रशांत शाहा, बंडू तुरे,उमाजी वाकडे, धनराज फुलझेले,पवन दुधबावरे,अनिकेत बांबोळे, प्रतिक खोबागडे,सौजन्य वनीकर, प्रांजल वाळके आदी उपस्थीत होते.