चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल; जलपूजन करून कन्नमवार जलाशयातून पाणी सोडण्यास सुरुवात
घोट : चामोर्शी तालुक्यातील शेतकरी नागरिकांच्या मागणीनंतर गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांच्या निर्देशानुसार कन्नमवार जलाशयाचे पाणी धान रोवणीसाठी सोडण्यात आले.
रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील स्थानिक रेगडी येथील (दिना धरण) कन्नमवार जलाशयाचे पाणी, येथील शेतकऱ्यांच्या मागणीनंतर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या रोवण्या पाण्याअभावी खोळंबल्या होत्या. त्यामुळे शेतकरी मोटार पंपांच्या सहाय्याने कसेबसे रोवणीची कामे करत होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी वारंवार पाणी सोडण्याची मागणी केली होती.

या मागणीची दखल घेत आमदार मिलिंद नरोटे यांनी कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडण्याचे निर्देश दिले. मुंबई येथून भ्रमणध्वनीद्वारे बोलताना त्यांनी, "मतदारसंघातील समस्त शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत," असे प्रतिपादन केले.
आज भारतीय जनता पार्टी, जिल्हा गडचिरोली, चामोर्शी मंडळ तसेच घोट सुभाष ग्राम मंडळ पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत घोट मार्गावरील गोलाबाई देवस्थान येथे जलपूजन करण्यात आले. त्यानंतर स्थानिक घोट शाखेचे अभियंता विकास दुधबळे व उपअभियंता यांच्या उपस्थितीत कन्नमवार जलाशयातील पाण्याचे विधिवत पूजन करून पाणी सोडण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटन प्रदेशाध्यक्ष व भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के, घोटच्या सरपंच रूपाली दुधबावरे, घोट मंडळ अध्यक्ष राकेश सरकार, चामोर्शी मंडळ अध्यक्ष रोशनीताई वरघंटे, महामंत्री संजय खेडेकर, विकास मैत्र, सौ. कविता किरमे, विलास उईके, राजेश्वर चौधरी, नीरज रामानुजनवार, नरेश अलसावार, श्रावण सोनटक्के, माणिक कोहळे, प्रशांत पालारपवार, विनोद किरमे, रोहिदास धोटे, संतोष दुधबळे, आनंदराव सातपुते, सुमेन विश्वास, पलाश घरामी, महेश विश्वास, पोपट आभारे, सोम वैद्य, उपसरपंच मिहीर विश्वास, सुकंठ रॉय, प्रकाश सातपुते तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटन जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कन्नमवार जलाशयाचे पाणी धान रोवणीसाठी उपलब्ध झाल्याने चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.