स्वच्छता दूत अनिल रंगारी यांच्या सत्कार
घोट (Nursing Training Certificate) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद संस्था,घोट यांच्या संयुक्त विद्यमाने घोट येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी गावातील स्वच्छता दूत सुनील रंगारी यांचा शाल,श्रीफळ व अंगवस्त्र देऊन सत्कार करण्यात आला.त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.
तसेच यावेळी नर्सिंग प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना नर्सिंग प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे (Nursing Training Certificate) वितरित करण्यात आली. यामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती अधिकार पत्रकार सेनेच्या जिल्हाध्यक्ष रुम्पा शहा होत्या. प्रमुख अतिथी म्हणून घोटचे तमुंस अध्यक्ष दिनकर लाकडे,पत्रकार हेमंत उपाध्ये, गणेश सरकार, रंजीता कुंडू, बाबुराव कुसराम, बबीता शहा, करिश्मा सरकार आदी उपस्थित होते. यावेळी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व विशद करत प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी नर्सिंग प्रशिक्षण घेतलेल्या मुलींना प्रमाणपत्रांचे वितरण करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.