घुग्घूस (Ghugus Youth Death) : येथील वर्धा नदी घाट परिसरात पाच तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आल्याने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. सोमवार (दि. ८ जून) रोजी दुपारी घराबाहेर पडलेले पाचही तरुण सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, घुग्घूस येथील इंदिरानगर परिसरातील तन्मय नवनाथ पथाडे (वय १८) हा आपल्या अन्य चार मित्रांसह सोमवारी दुपारी घरून बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याशी कोणताही संपर्क न झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. शोध घेत असताना वर्धा नदीजवळील डब्ल्यूसीएल पाण्याच्या टाकी संकुल परिसरातील वाळूत पाचही तरुणांचे कपडे, शूज, चप्पल आणि मोबाईल संशयास्पद (Ghugus Youth Death) अवस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच घुग्घूस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तसेच चंद्रपूर येथून विशेष बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. मंगळवारी सकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास बचाव पथकाला तन्मय नवनाथ पथाडे याचा मृतदेह डब्ल्यूसीएल पाण्याच्या टाकी संकुलाजवळ नदीपात्रात तरंगताना (Ghugus Youth Death) आढळून आला. दरम्यान, इतर चार बेपत्ता तरुणांचा शोध घेण्यासाठी नदीत मोठ्या प्रमाणावर पोलीस, बचाव पथके आणि स्थानिक नागरिकांकडून शोधमोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान नकुल भास्कर केळझळकर व सन्नी अशोक आरपेल्ली यांचे (Ghugus Youth Death) मृतदेहही आढळून आले. उर्वरित दोघांचा शोध अद्याप सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण घुग्घूस परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करीत असून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
वर्धा नदीत पाच तरुणांना जलसमाधी; घुग्घूस शहरावर शोककळा
Ghugus Youth Death: घुग्घूस शहरातील वर्धा नदी घाटात पाच तरुण बुडल्याची घटना सोमवार रोजी घडली. त्यांचा शोध करताना नदीत त्यांचे शव आढळले. घटनेपासून तपास सुरू असून चार तरुणांचा शोध अद्याप चालू आहे.
Ghugus Youth Death
संबंधित सामग्री
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी
नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
परभणीत गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन युवक गोदावरी पात्रात बुडाले
परभणीतील धानोरा काळे येथे गणेश विसर्जनानंतर गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवक बुडाले. एनडीआरएफ पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे.
मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराची कमान कोसळली; 2 जणांचा मृत्यू? 7 ते 8 कामगार जखमी
मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असून जेसीबीच्या सहाय्याने बचावकार्य सुरू आहे.
इंडोनेशियात २४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज अचानक गायब; जावा समुद्रात शोधमोहीम सुरू
इंडोनेशियातील जावा समुद्रात २४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ‘व्हार्गो ट्रान्सपोर्ट ८’ जहाजाचा संपर्क तुटला असून बचाव पथकांकडून शोधमोहीम सुरू आहे.
दिल्ली हादरली! सत्या निकेतनमध्ये इमारत कोसळून 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू
Delhi Building Disaster: दिल्लीतील सत्या निकेतन परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. तब्बल १६ तास बचावकार्य सुरू..