दिल्ली इमारत दुर्घटना

दिल्ली हादरली! सत्या निकेतनमध्ये इमारत कोसळून 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Delhi Building Disaster: दिल्लीतील सत्या निकेतन परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. तब्बल १६ तास बचावकार्य सुरू..

दिल्ली हादरली! सत्या निकेतनमध्ये इमारत कोसळून 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Delhi Building Disaster

 

16 तासांच्या बचावकार्यानंतर ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर;
अनधिकृत बांधकामाच्या संशयाने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली(Delhi Building Disaster) : दिल्लीतील सत्या निकेतन परिसरात रविवारी दुपारी पाच मजली इमारत अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या इमारतीचा वापर खासगी विद्यार्थी वसतिगृहासाठी केला जात होता. दुर्घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाल्याची माहिती आहे.

घटना घडल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह विविध बचाव पथकांनी रात्रभर ढिगारा हटवून शोधमोहीम राबवली. सुमारे 16 तासांच्या बचावकार्यानंतर सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास आणखी एका व्यक्तीचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आला. त्यामुळे मृतांचा आकडा सातवर पोहोचला.

बांधकाम नियमांच्या उल्लंघनाचा संशय

सुमारे 50 वर्षे जुनी असलेल्या या इमारतीच्या बांधकामाबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत. इमारतीत अतिरिक्त मजले उभारण्यात आल्याचे तसेच काही भागात अनधिकृत बांधकाम आणि दुरुस्तीची कामे झाल्याचा संशय आहे. तसेच इमारतीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी आवश्यक मार्गाची व्यवस्था होती का, याचाही तपास सुरू आहे.

स्थानिक नागरिक धावले मदतीला

इमारत कोसळल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट पसरले होते. (Delhi Building Disaster) बचाव पथके घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. दरम्यान, स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनीही बचावकार्यात मदत केली.

मालक आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी

या (Delhi Building Disaster) दुर्घटनेप्रकरणी इमारतीचा मालक तसेच संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तपासली जात आहे. अनधिकृत बांधकाम किंवा सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेनंतर दिल्लीतील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा इमारतींची नियमित तपासणी तसेच बांधकाम नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

संबंधित सामग्री

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
‘लोकांचं मनोरंजन करता करता मीच ड्रामा झालो’; कोर्टात राजपाल यादव भावुक; १.१५ कोटी जमा, उर्वरित ८५ लाखांसाठी मुदत

‘लोकांचं मनोरंजन करता करता मीच ड्रामा झालो’; कोर्टात राजपाल यादव भावुक; १.१५ कोटी जमा, उर्वरित ८५ लाखांसाठी मुदत

चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादवांनी सुप्रीम कोर्टात १.१५ कोटींचा डिमांड ड्राफ्ट दिला. उर्वरित ८५ लाखांसाठी कोर्टाने दोन आठवड्यांची मुदत दिली.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026