बीडमधील पुरुषोत्तमपुरी येथे भाविकांनी भरलेली बोट गोदावरीत उलटली; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथे पवित्र अधिक मासानिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मोठे संकट कोसळले.

बीडमधील पुरुषोत्तमपुरी येथे भाविकांनी भरलेली बोट गोदावरीत उलटली; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Godavari river boat accident

माजलगाव तालुक्यातील दुर्घटनेत ५० ते ६० भाविक बोटीत असल्याची माहिती; २० जणांची सुटका, बेपत्ता भाविकांचा शोध सुरू

बीड (Godavari river boat accident) : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथे पवित्र अधिक मासानिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मोठे संकट कोसळले. गोदावरी नदीपात्रातून प्रवास करणारी भाविकांची बोट अचानक उलटल्याने गंभीर दुर्घटना घडली असून प्रशासन आणि स्थानिकांकडून तातडीने बचाव मोहीम राबविण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त बोटीत सुमारे ५० ते ६० भाविक प्रवास करत होते. दुर्घटनेनंतर स्थानिक बोट चालक तसेच प्रशासनाच्या पथकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. आतापर्यंत २० भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरित प्रवाशांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

अधिक मासानिमित्त पुरुषोत्तमपुरी येथे राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली आहे. गोदावरी नदी पार करण्यासाठी भाविकांना बोटींचा वापर करावा लागतो. दरम्यान, अधिक उत्पन्नाच्या हेतूने काही बोटींमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जात असल्याचा आरोप स्थानिक स्तरावर करण्यात येत आहे.

याच निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याची चर्चा सुरू असून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेतल्याने बोट नदीपात्रात उलटल्याचा आरोप केला जात आहे. या अपघातात काही लहान मुले बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दुर्घटनेची तीव्रता अधिक गंभीर मानली जात आहे.

बोटीत अंदाजे ६० जण असल्याचे सांगितले जात असून त्यापैकी २० जणांना वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित भाविकांचा शोध घेण्यासाठी नदीपात्रात बचावकार्य अखंडपणे सुरू असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
परभणीत गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन युवक गोदावरी पात्रात बुडाले

परभणीत गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन युवक गोदावरी पात्रात बुडाले

परभणीतील धानोरा काळे येथे गणेश विसर्जनानंतर गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवक बुडाले. एनडीआरएफ पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे.

Sep 27, 2026
मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराची कमान कोसळली; 2 जणांचा मृत्यू? 7 ते 8 कामगार जखमी

मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराची कमान कोसळली; 2 जणांचा मृत्यू? 7 ते 8 कामगार जखमी

मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असून जेसीबीच्या सहाय्याने बचावकार्य सुरू आहे.

Sep 21, 2026
इंडोनेशियात २४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज अचानक गायब; जावा समुद्रात शोधमोहीम सुरू

इंडोनेशियात २४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज अचानक गायब; जावा समुद्रात शोधमोहीम सुरू

इंडोनेशियातील जावा समुद्रात २४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ‘व्हार्गो ट्रान्सपोर्ट ८’ जहाजाचा संपर्क तुटला असून बचाव पथकांकडून शोधमोहीम सुरू आहे.

Sep 13, 2026
दिल्ली हादरली! सत्या निकेतनमध्ये इमारत कोसळून 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू

दिल्ली हादरली! सत्या निकेतनमध्ये इमारत कोसळून 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Delhi Building Disaster: दिल्लीतील सत्या निकेतन परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. तब्बल १६ तास बचावकार्य सुरू..

Sep 07, 2026