- पंचक्रोशीतील भाविकांमध्ये गोंधळाची उत्सुकता
- भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था
अकोला - मूर्तिजापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराहित येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमेनिमित्त भव्य गोंधळाचे आयोजन करण्यात आले आहे. आई तुळजाभवानी संस्थान मंदिरात गुरुवार, २ एप्रिल रोजी हा धार्मिक सोहळा रात्रभर मोठ्या उत्साहात पार पडणार असून, पंचक्रोशीतील भाविकांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
गोंधळ हा परंपरेचा व भक्तीचा संगम मानला जातो. यानिमित्ताने परिसरात धार्मिक वातावरण निर्माण होऊन भक्तीमय जल्लोष बघायला मिळतो. तीर्थक्षेत्र विराहित येथील तुळजाभवानी मंदिरात होणारा हा गोंधळ विशेष आकर्षण ठरत असून, दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. यंदाही आयोजकांनी नियोजनबद्ध तयारी केली असून कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, गुरूवारीदुपारी ४ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील गोंधळासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. आई तुळजाभवानी गोंधळ कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील तसेच अकोला जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सामाजिक एकोपा अन परंपरेचे जतन
या धार्मिक कार्यक्रमामुळे विराहित परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण होणार असून, सामाजिक एकोपा व परंपरेचे जतन यालाही चालना मिळणार आहे. भाविकांनी या पवित्र सोहळ्याचा लाभ घेऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन तीर्थक्षेत्र विराहित येथील आई तुळजाभवानी संस्थान व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
चैत्र पौर्णिमेनिमित्त तीर्थक्षेत्र विराहित येथे उद्या भव्य गोंधळ
विराहित के तुळजाभवानी मंदिर में गोंधळ उत्सव का आयोजन किया गया, जिसमें भाविकों के लिए महाप्रसाद की व्यवस्था भी की गई है।
संबंधित सामग्री
चारधाम यात्रेने रचला नवा विक्रम; भाविकांची संख्या तब्बल 56.18 लाखांपार
Chardham Yatra Record: यंदा केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारही धामांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटन
श्री राजस्थान बाल गणेश मंडळाकडून भव्य अन्नदान
हिंगोलीतील चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी राजस्थान बाल गणेश मंडळाकडून भव्य अन्नदान; लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू
बुलढाणा–काशी पोहरादेवी मुक्काम एसटी बससेवा २५ सप्टेंबरपासून सुरू; भाविकांना दिलासा. पोहरादेवीत एसटी डेपो उभारण्याची मागणी.
अनंत चतुर्दशीला मुंबईकरांना मोठा दिलासा; मेट्रो लाईन-3 रात्रभर धावणार, विसर्जनानंतर घरी परतणे होणार सोपे
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीला मुंबई मेट्रो-3 रात्रभर धावणार. गर्दी आणि वाहतूक कोंडीच्या काळात भाविकांना परतीच्या प्रवासासाठी मोठा दिलासा.
महाप्रसाद, भंडाऱ्यासाठी आता FDAची परवानगी आवश्यक; तुकाराम मुंढेंचा नवा ॲक्शन प्लॅन
सण-उत्सवांच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, तसेच अन्नभेसळीला आळा घालता यावा यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने वर्षभरासाठी विशेष नियोजन केले आहे.