Mahaprasad

श्री राजस्थान बाल गणेश मंडळाकडून भव्य अन्नदान

हिंगोलीतील चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी राजस्थान बाल गणेश मंडळाकडून भव्य अन्नदान; लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

श्री राजस्थान बाल गणेश मंडळाकडून भव्य अन्नदान

Mahaprasad

अनंत चतुर्दशीला चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या शेवटपर्यंतच्या भाविकांनाही महाप्रसादाचा लाभ

हिंगोली : शहरातील नवसाला पावणारा आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो भाविक हिंगोली शहरात दाखल झाले होते. दूरवरून आलेल्या या भाविकांच्या सेवेसाठी राजस्थान व्यायाम शाळा संचालित ‘श्री राजस्थान बाल गणेश मंडळा’च्या वतीने बालाजी मंदिर परिसरात भव्य अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या महाप्रसादाचा लाखो भाविकांनी भक्तिभावाने आणि शिस्तबद्ध वातावरणात लाभ घेतला.

या सामाजिक आणि धार्मिक उपक्रमाला आमदार संतोषराव बांगर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेल्या अन्नदान उपक्रमाचे त्यांनी मनापासून कौतुक केले. यावेळी भाजपा युवा जिल्हाध्यक्ष शिवाजी तानाजीराव मुटकुळे, युवा शिवसेना जिल्हाप्रमुख राम कदम, शिवसेना गटनेते नगरसेवक श्रीराम बांगर आणि नगरसेवक गणेश बांगर उपस्थित होते. त्यांनीही आयोजकांच्या कार्याचे कौतुक केले.

अन्नदान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी विशेष पुढाकार घेतला. यामध्ये कपिल खंडेलवाल, गोविंद खंडेलवाल, उद्योजक अनिल नैनवाणी, शासकीय कंत्राटदार मयूर कयाल, जुगल खंडेलवाल, सुमित चौधरी, भरत चौधरी, श्याम खंडेलवाल, मुरली हेडा, मधुर भन्साळी, राघव खंडेलवाल, जुगल खंडेलवाल आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतल्यानंतर समाधान व्यक्त केले. आयोजकांनी केलेली प्रसादाची व्यवस्था, स्वच्छता आणि आदरतिथ्य कौतुकास्पद असल्याचे भाविकांनी सांगितले.

राजस्थान व्यायाम शाळा आणि राजस्थान बाल गणेश मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या सामाजिक व धार्मिक उपक्रमाचे हिंगोली शहरासह भाविकांमध्ये कौतुक होत आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026