शॉर्टसर्किट गोठा आग

शॉर्टसर्किटने पेटला गोठा; दाताडा बुद्रुकमध्ये शेतकऱ्याचे सुमारे २ लाखांचे नुकसान

Short Circuit Fire: सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुकमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागून शेतकऱ्याच्या गोठ्याचे सुमारे २ लाखांचे नुकसान झाले. ग्रामस्थांची मदतीची मागणी.

शॉर्टसर्किटने पेटला गोठा; दाताडा बुद्रुकमध्ये शेतकऱ्याचे सुमारे २ लाखांचे नुकसान

Short Circuit Fire

सेनगाव (Short Circuit Fire) : सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्याच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना शनिवारी दि. १८ मार्चला दुपारी उघडकीस आली. या (Short Circuit Fire) आगीत शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दाताडा बुद्रुक येथील शेतकरी साहेबराव देविदास गायकवाड यांच्या आजेगाव शिवारातील शेतातील गोठ्याला दुपारी सुमारे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, (Short Circuit Fire) आगीची तीव्रता मोठी असल्याने गोठ्यातील बहुतांश साहित्य जळून खाक झाले.

या (Short Circuit Fire) आगीत तुषार सिंचन संच, टिन पत्रे, विविध शेती अवजारे, फवारणी पंप, डायनामा इंजिन तसेच जनावरांचा चारा आदी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर या घटनेने दुहेरी संकट कोसळले आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा आणि शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरीवर्गातून होत आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026