Gutkha Seized

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आणलेला १.१३ कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त; FDAचा ६ तास थरारक पाठलाग

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आणला जाणारा १.१३ कोटींचा प्रतिबंधित गुटखा FDAने जप्त केला. सहा तासांच्या पाठलागानंतर ट्रक ताब्यात; चौघांवर गुन्हा दाखल.

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आणलेला १.१३ कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त; FDAचा ६ तास थरारक पाठलाग

Gutkha Seized

संगमनेर ते राजगुरुनगर टोलनाका ट्रकचा पाठलाग; गुटखा, पानमसाला आणि ट्रक जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल

पुणे : मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात बेकायदेशीर विक्रीसाठी आणला जात असलेला प्रतिबंधित गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने मोठी कारवाई करत जप्त केला आहे. संगमनेरपासून राजगुरुनगर टोलनाक्यापर्यंत तब्बल सहा तास ट्रकचा पाठलाग केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत १ कोटी १३ लाख ५४ हजार ६०० रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला आणि ट्रक जप्त करण्यात आला आहे.

गुप्त माहिती मिळताच FDAची कारवाई

पुणे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा महाराष्ट्रात आणला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे १८ सप्टेंबर रोजी FDAच्या पथकाने संबंधित ट्रकचा माग काढण्यास सुरुवात केली.

संगमनेरपासून सुरू झालेला हा पाठलाग राजगुरुनगर टोलनाक्यापर्यंत जवळपास सहा तास सुरू होता. अखेर FDAच्या पथकाला ट्रक अडवून ताब्यात घेण्यात यश आले. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला आढळून आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल

या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून चाकण उत्तर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात नफीस मेहबूब खान (वाहन चालक), निलेश राठी आणि अरुण पाटील (पुरवठादार), मेसर्स जे. एम. डी. इंटरप्रायझेस (वाहन मालक) आणि संजय माटा (वाहतूकदार) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MCOCA अंतर्गत कारवाईची शिफारस

राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक आणि विक्री करण्याचा प्रकार संघटित गुन्हेगारीशी संबंधित असल्याचे नमूद करत, संबंधित आरोपींवर मोक्का (MCOCA) कायद्यांतर्गत कारवाई करण्याची सूचना अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांना केली आहे.

दरम्यान, चाकण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, प्रतिबंधित गुटख्याच्या पुरवठ्यामागील इतर बाबींचाही तपास केला जात आहे.

संबंधित सामग्री

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; उर्वरित २५ हजार रुपये घेताना तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली.

Oct 04, 2026
MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला.

Oct 02, 2026
FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; संजय राऊतांच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर.

Sep 29, 2026
सचिन वाझेला मोठा दिलासा; अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जामीन

सचिन वाझेला मोठा दिलासा; अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जामीन

अँटिलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला विशेष NIA कोर्टाने जामीन मंजूर केला. सविस्तर आदेश अद्याप समोर आलेला नाही.

Sep 29, 2026
निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

२०२०च्या खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची मोक्का कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. फिर्यादी आणि साक्षीदारांनी आरोप नाकारले.

Sep 29, 2026