हिंगोली (Hingoli Bakri Eid) : मुस्लिम संस्कृतीमध्ये चंद्राची कोर असलेल्या बोकडाला अल्लाच्या रूपात पवित्र असे मानले जाते. असेच हिंगोली शहराजवळ असलेल्या बळसोंड शिक्षक कॉलनी भागातील रामेश्वर शामराव गवई यांच्या शेळ्याच्या कळपामध्ये मागील अनेक वर्षापासून शेळीपालनाचा व्यवसाय करतात या शेळी पालनामध्ये त्यांच्या शेळीला बोकडाने दिड वर्षापूर्वी चक्क चंद्राची कोर असलेला गोंडस असा जन्म दिला. बाजारपेठेत या बोकडाला अनेक मुस्लिम बांधवांनी चंद्राची कोर असलेल्या बोकडाला विक्रीची मागणी घातली आहे. मात्र या चंद्राची कोर असलेल्या बोकडाला पाच लाखावरपर्यंत मागणी होत असल्याचे शेळी पालन व्यवसाय करणारे रामेश्वर गवळी यांनी सांगितले. मात्र या बोकडाला पाहण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे.
मुस्लिम संस्कृतीमध्ये चंद्रकोरीला अत्यंत महत्त्व आहे. हिंगोली शहराजवळ असलेल्या बळसोंड, शिक्षक कॉलनी भागातील रामेश्वर शामराव गवई हे मागील दहा ते पंधरा वर्षापासून शेळी पालन व्यवसाय करतात शेळी पालन करत असताना त्यांच्या चालण्याची व पाण्याची व्यवस्था रामेश्वर गवई हे मागील अनेक वर्षापासून मोठ्या कटाक्षाने व नेटाने करत असतात त्यांच्याकडे सध्या ४० शेळ्या व पाच बोकडे आहेत. या व्यवसायामध्ये बोकुड व शेळीचे पालन करत असताना दीड वर्षांपूर्वी एका शेळीला गोंडस असे चंद्राची कोर असलेले एक बोकुड व एक शेळीच्या पिल्लाला जन्म दिला. याचे मागील दीड वर्षापासून पालन पोषण केल्या जात आहे.
चंद्राची कोर डोक्यावर असल्याने पवित्र मुस्लिम समाजात या बोकडाला असाधारण महत्व आहे. चंद्राची कोर असलेल्या बोकडाच्या समोर व पाठीमागच्या दोन्ही पायांना चंद्रासारखे पांढरी कोर दिसून येते तर त्या बोकडाच्या छातीलाही भली मोठी पांढरी चंद्राच्या कोरी सारखा रंग दिसून येत आहे. हा बोकड शुभ समजल्या जातो, आणि बकरी ईदच्या दिवसात या चंद्रकोर असलेल्या (Hingoli Bakri Eid) बोकडाला मुस्लिम समाजाकडून चांगलीच मागणी असते, हिंगोली शहरातील एका मुस्लिम समाजातील व्यापार्यांनी घरी येऊन तीन लाख पाच हजार रुपयाला या बोकडाची मागणी केली आहे. परंतु शेळी व बोकुड पालन व्यवसाय करणारे रामेश्वर गवई यांनी या बोकडाचे पालन पोषण करून साडेपाच लाखाच्या वर किंमत आल्यास बकरी ईद च्या मुहूर्तावर सोडणार असल्याचे सांगितले.
हिंगोली बकरी ईद
बकरी ईदच्या मुहूर्तावर चंद्राची कोर असलेल्या आकर्षक बोकडाला पाहण्यासाठी होतेय गर्दी
Hingoli Bakri Eid: हिंगोली शहराजवळील रामेश्वर शामराव गवई यांनी दीड वर्षापासून पालन केलेल्या चंद्रकोरी बोकडाला पवित्र मानले जाते. बकरी ईदच्या मुहूर्तावर
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Hingoli Bakri Eid
टैग्स:
chamunda cow
halal cow
chandrakori bokra
Eid celebration
halal animal market
holy cow
religious significance
halal livestock
animal breeding
संबंधित सामग्री
कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रशासन दक्ष: पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन
Police Administration Peace Committee: बकरीदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागरिकांच्या अडचणी जाणून घेत सण-उत्सवांदरम्यान शासनाच्या दिशानिर्देशांचे पा
May 25, 2026