पोलीस प्रशासन शांतता समिती

कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रशासन दक्ष: पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन

Police Administration Peace Committee: बकरीदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागरिकांच्या अडचणी जाणून घेत सण-उत्सवांदरम्यान शासनाच्या दिशानिर्देशांचे पा

कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रशासन दक्ष: पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन

Police Administration Peace Committee

कळमनुरी (Police Administration Peace Committee) : बकरीदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागरिकांच्या अडचणी जाणून घेत सण-उत्सवांदरम्यान शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करून सण साजरा करण्याचे व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. निलभ रोहन यांनी केले. तसेच पोलीस प्रशासन पूर्णपणे दक्ष असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

येत्या बकरीद निमित्त शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांनी ईद शांततेत साजरी करावी आणि शासनाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने आज  25 मे रोजी तहसील कार्यालयात शांतता समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलभ रोहन होते. प्रमुख उपस्थितीत जिल्हा पोलीस उपअधीक्षक कुंदन कुमार वाघमारे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपविभागीय अधिकारी मयूर कासारे, तहसीलदार जिवककुमार कांबळे, पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष इंगळे, गट विकास अधिकारी अमित कुमार मुंडे, नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक मोहम्मद नदीम आदी उपस्थित होते.

बैठकीत ईदच्या पार्श्वभूमीवरील समस्या व अडचणी जाणून घेऊन त्या दूर करण्यासंबंधी संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. पोलीस अधीक्षक डॉ. निलभ रोहन यांनी ईद निमित्त शासनाच्या दिशानिर्देशांबाबत माहिती दिली व नागरिकांनी त्या सूचनांचे पालन करून कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले.

या (Police Administration Peace Committee) बैठकीस माजी नगराध्यक्ष बंडू पाटील, नंदकिशोर तोष्णीवाल, मौलाना अब्दुल करीमोद्दीन सिद्दीकी, अब्दुल हफीज अझरी, काझी शुजात फारुकी, डॉ. सतीश पाचपुते, संतोष सारडा, नगरसेवक खाजा बागबान, अय्युब पठान, कैलास पारवे, बबलू पत्की, बाळू घुसे, गंगाधर बेले, आवेज पठान, कुलभूषण बुर्से, कांता पाटील, ॲड. तुषार पवार यांच्यासह पोलीस पाटील, राजकीय-सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठक यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रवी इंगोले, गजानन होळकर, सतीश शेळके, किशोर खिल्लारे, गुलाब जाधव, विलास बांगर यांनी परिश्रम घेतले.

संबंधित सामग्री

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
‘निर्भयानंतर किती बदल झाला?’ दिल्ली-NCRमधील घटनांवर सुप्रीम कोर्टाचा गंभीर सवाल

‘निर्भयानंतर किती बदल झाला?’ दिल्ली-NCRमधील घटनांवर सुप्रीम कोर्टाचा गंभीर सवाल

दिल्ली-NCRमधील लैंगिक अत्याचारांच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाची सुओ मोटू दखल; सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेवर दिल्ली पोलिसांना सवाल.

Sep 28, 2026
मानोरा तालुका परिसरात ड्रोनच्या घिरट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

मानोरा तालुका परिसरात ड्रोनच्या घिरट्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

मानोरा तालुक्यात अनेक गावांत रात्री संशयास्पद ड्रोन दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीती. प्रशासनाने ड्रोनच्या हालचालींबाबत तातडीने खुलासा करण्याची मागणी.

Sep 26, 2026
गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करावा; डिवायएसपी मनीष ठाकरे यांचे आवाहन

गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करावा; डिवायएसपी मनीष ठाकरे यांचे आवाहन

मानोरा येथे शांतता समितीच्या बैठकीत डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर, सोशल मीडिया अफवांपासून सतर्कता आणि सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहन.

Sep 13, 2026
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाला पोलिसांचा नकार; आझाद मैदानाची परवानगी रद्द

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाला पोलिसांचा नकार; आझाद मैदानाची परवानगी रद्द

मनोज जरांगे पाटील यांच्या १९ सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील उपोषणाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली. कायदा-सुव्यवस्था आणि गणेशोत्सवाचे कारण पुढे केले.

Sep 13, 2026