आज हनुमान जयंती सव्वा लाख हनुमान चालिसा पठणाचा संकल्प
सकाळी ६ ते रात्री ११ संगीत समारोह
सायंकाळी ७ वाजता होणार महाआरा
अकोला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेस पात्र झालेले त्यांचे शिष्यत्तम श्री हनुमान आजही भक्तांच्या समस्यांचे निराकरण करतात, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. येथील मोहता मील परिसरातील तब्बल ४५९ वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या मंदिरातील मातृभक्त तपे हनुमान यांचा कृपाप्रसाद हजारो मक्तांनी अनुभवला आहे. तमाम मक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे भारतवर्षातील एकमेव मातृभक्त तपे हनुमान मंदिराची स्थापना १५६४ साली झाली. या मंदिराला तब्बल ४५९ वर्षांची परंपरा लाभली आहे.
या मंदिरात ४५९ वर्षापासून अखंड दीप सुरू आहे. सलग ५ शनिवार किंवा ५ मंगळवार अंजनीमाता आणि हनुमानजींचे दर्शन घेत्तल्याने कुठल्याही आजाराचे निराकरण होत असून, येणारी एखादी आपत्ती टळत असल्याचा अनुभव हजारो भक्तांना आहे. यंदा गुरुवार, ६ एप्रिल रोजी हनुमान जयती असून, या दिवशी परंपरेनुसार सकाळी ६ वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे. तसेच हनुमान जयंतीनिमित्त गुरुवारी सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या संगीत सोहळ्यात तपे हनुमान
महिला मंडळ आणि प्रा. देवेंद्र देशमुख आणि संच, तसेच नाना फडके, रवी कसबेकर, सतीश खोडवे, राजू सोनवणे, राम पांडे, सूर्यकांत कुडूपले सहभागी होत आहेत. सकाळी ६ वाजता राजू जोशी यांचे 'बासरी रंग' तर सकाळी ७ वाजतापासून स्वररंग, 'गुरुनामी रंग' दुपारी १ वाजता तपे हनुमान मंडळ कलावंतांचे सुंदरकांड दुपारी ३ वाजता 'शब्द रंग' दुपारी ४ वाजता भावरंग सायंकाळी ६ वाजता 'शाडवरंग' सायंकाळी ७ वाजता महाआरती होणार आहे. तसेच सायंकाळी ७.३० ते १० राजू सोनोने, नीरज लांडे आणि पंडित प्रदीप शर्मा, प्रा. डॉ. किशोर देशमुख या संगीत समारंभात सहभागी होणार आहेत. यावेळी त्यांना
मनोज जहागीरदार, पवन सिडाम, बोंबीलवार, अजिंक्य इनामदार अभिषेक हुपेले यांची साथ संगत आहे.
मातृभक्त तपे हनुमान मंडळ गुरुवारी सायंकाळी ७ वाजता गेल्या दशकांपासून संस्थानचे मार्गदर्शक सर्वसेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांच्या उपस्थितीत महाआरती आहे. या संगीत समारंभमहाआरतीत भाविकांनी मोठ्या सहभागी होण्याचे आवाहन मातृभहनुमान सेवा समिती आणि मातृभहनुमान सेवाधारी समितीतर्फे क आले आहे.
अकोल्यात भारतातील एकमेव मातृभक्त तपे हनुमान मंदिर : ४५९ वर्षांपासून अखंड दीप
हनुमान जयंती के अवसर पर सव्वा लाख हनुमान चालिसा का पठण और संगीत समारोह का आयोजन किया गया। समारोह में कई प्रसिद्ध कलाकार भाग लेंगे।
संबंधित सामग्री
राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी
राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.
स्मृती मंधाना बनली टीम इंडियाची नवी कर्णधार
India captain Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेट संघाला नवी कर्णधार मिळाली असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्मृती मंधानाची सर्व प्रकारच्या क्रिकेटसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.
सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना
नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप
आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.
दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; २४ कॅरेट सोने ₹१,४९,७०० वर
दसऱ्याआधी सोन्याच्या दरात घसरण झाली. २४ कॅरेट सोने ₹१,४९,७००, तर २२ आणि १८ कॅरेटचे दरही कमी झाले.