पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

मुंबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये खरातने एक सूट वर्षभरासाठी कायमस्वरूपी बुक करून ठेवली होती.

पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

Hawala Racket

बाबाच्या सूटमधून करोडोंचा खेळ? तपासात धक्कादायक आर्थिक लिंक

नाशिक (Hawala Racket) : नाशिक मध्ये समोर आलेल्या भोंदू बाबाअशोक खरात प्रकरणात तपास पुढे सरकत असताना नवे आणि धक्कादायक तपशील उघड होत आहेत. अंधश्रद्धेच्या आडून लोकांना जाळ्यात ओढणाऱ्या खरातने आर्थिक गैरव्यवहारांसाठी ‘हवाला’ मार्गाचा वापर केल्याची माहिती समोर येत असून या व्यवहारांसाठी मुंबईमधील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलचा आधार घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

तपासातून असेही समोर आले आहे की, मुंबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये खरातने एक सूट वर्षभरासाठी कायमस्वरूपी बुक करून ठेवली होती. दिवसाला सुमारे २५ हजार रुपये भाड्याच्या या खोलीतून कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांचे नियोजन आणि देवाणघेवाण होत असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा व्याप केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित नसून मोठ्या आर्थिक साखळीशी संबंधित असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय वळण मिळण्याची शक्यता देखील तपासात पुढे येत आहे. हवाला व्यवहारांमधील काही रक्कम परदेशात, विशेषतः दुबईपर्यंत पोहोचत असल्याचा संशय असून विशेष तपास पथक (SIT) या दृष्टीने अधिक सखोल चौकशी करत आहे.

या प्रकरणातील मानवी बाजूही तितकीच गंभीर आहे. खरातच्या संपर्कात आलेल्या सुमारे आठ ते नऊ महिलांवर मानसिकदृष्ट्या मोठा परिणाम झाल्याचे समोर आले आहे. काही महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली असून, काहीजणी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घरातच एकट्या राहण्यास भाग पडल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर तपास पथकाने संबंधित महिलांना संपूर्ण संरक्षण देण्याचे आश्वासन दिले असून चौकशीही संवेदनशील पद्धतीने केली जात आहे.

याशिवाय, या प्रकरणाशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांविरोधातही पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. सायबर विभागाकडून अशा घटकांवर लक्ष ठेवण्यात येत असून प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू आहे.

संबंधित सामग्री

निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी

निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी

नाशिक धर्मांतर प्रकरणातील निदा खानसमोर वैवाहिक संकट. आठ महिन्यांची गर्भवती असताना पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून १६ ऑक्टोबरला कोर्टात हजेरी आहे.

Oct 04, 2026
नाशिकच्या पंचवटीत बंद चारचाकीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; दुर्गंधीमुळे उघडकीस आला प्रकार

नाशिकच्या पंचवटीत बंद चारचाकीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; दुर्गंधीमुळे उघडकीस आला प्रकार

नाशिकच्या पंचवटीत बंद चारचाकीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. दुर्गंधीमुळे नागरिकांना संशय आला. मृत्यूचे कारण व ओळख पटवण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू.

Sep 21, 2026
मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; उभ्या ट्रकला इर्टिगा कारची धडक, ४ ठार तर ६ जखमी

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; उभ्या ट्रकला इर्टिगा कारची धडक, ४ ठार तर ६ जखमी

शहापूरच्या आटगाव येथे मुंबई-नाशिक महामार्गावर इर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. उभ्या ट्रकला धडकून चार जणांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाले.

Sep 16, 2026
नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा ‘गोल्डन मोदक’; किंमत तब्बल २७ हजार रुपये किलो

नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा ‘गोल्डन मोदक’; किंमत तब्बल २७ हजार रुपये किलो

नाशिकच्या सागर स्वीट्सने २४ कॅरेट खाण्यायोग्य सोन्याचा ‘गोल्डन मोदक’ तयार केला असून त्याची किंमत तब्बल २७ हजार रुपये किलो आहे.

Sep 15, 2026
गणरायाच्या स्थापनेसाठी कंपनीत गेले, परतताना काळाचा घाला; नाशिकमध्ये इंजिनिअरचा मृत्यू

गणरायाच्या स्थापनेसाठी कंपनीत गेले, परतताना काळाचा घाला; नाशिकमध्ये इंजिनिअरचा मृत्यू

नाशिकच्या मुंबई नाका परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने ३३ वर्षीय मॅकेनिकल इंजिनिअर किरण चांगदेव नरोडे यांचा मृत्यू झाला. ट्रकचालक पसार झाला आहे.

Sep 15, 2026