Thane Accident

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; उभ्या ट्रकला इर्टिगा कारची धडक, ४ ठार तर ६ जखमी

शहापूरच्या आटगाव येथे मुंबई-नाशिक महामार्गावर इर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. उभ्या ट्रकला धडकून चार जणांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाले.

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; उभ्या ट्रकला इर्टिगा कारची धडक, ४ ठार तर ६ जखमी

Thane Accident

शहापूर तालुक्यातील आटगाव येथील घटना; त्र्यंबकेश्वरहून मुंबईकडे जात असताना काळाचा घाला

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील आटगाव येथे इर्टिगा कार आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमध्ये भीषण धडक झाली. या दुर्घटनेत कारमधील चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, इर्टिगा कारमधून प्रवास करणारे हे सर्वजण त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने परतत होते. आटगाव परिसरात कार आली असता रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारने जोरदार धडक दिली. धडक एवढी तीव्र होती की, कारमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

या अपघातातील मृतांची नावे श्रीराम जैस्वाल, आयुष जैस्वाल, लाडो जैस्वाल आणि सुरज जैस्वाल अशी आहेत. तर सुभी जैस्वाल, शिवम जैस्वाल, हाशिक जैस्वाल, सुनीता जैस्वाल, राधिका जैस्वाल आणि सतीश जैस्वाल हे सहा जण जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांसह संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त इर्टिगा कार जोगेश्वरी येथील असल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.

संबंधित सामग्री

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
पुण्यात भरधाव डंपरची दुचाकीला धडक; २० वर्षीय IT इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

पुण्यात भरधाव डंपरची दुचाकीला धडक; २० वर्षीय IT इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

महंमदवाडीत भरधाव डंपरच्या धडकेत २० वर्षीय IT इंजिनिअर हमजा इब्राहिम सरकारचा मृत्यू झाला. एक तरुण गंभीर जखमी असून डंपर चालकाला अटक करण्यात आली.

Sep 23, 2026
गणरायाच्या स्थापनेसाठी कंपनीत गेले, परतताना काळाचा घाला; नाशिकमध्ये इंजिनिअरचा मृत्यू

गणरायाच्या स्थापनेसाठी कंपनीत गेले, परतताना काळाचा घाला; नाशिकमध्ये इंजिनिअरचा मृत्यू

नाशिकच्या मुंबई नाका परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने ३३ वर्षीय मॅकेनिकल इंजिनिअर किरण चांगदेव नरोडे यांचा मृत्यू झाला. ट्रकचालक पसार झाला आहे.

Sep 15, 2026
पोळ्याच्या आनंदावर काळाचा क्रूर घाला; ट्रकने महिलेला चिरडले..

पोळ्याच्या आनंदावर काळाचा क्रूर घाला; ट्रकने महिलेला चिरडले..

Deori truck accident: बैलपोळ्याच्या सणाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना एका हसत्याखेळत्या कुटुंबावर काळाने अत्यंत क्रूर घाला घातला आहे.

Sep 11, 2026
गोंदियात भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू

गोंदियात भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू

Gondia Accident गोंदिया जिल्ह्यातील नागरा परिसरात भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पिकअपमधून प्रवास करणाऱ्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण गंभीर

Sep 08, 2026