मिशन ऊर्जा अभियान

हिंगोलीत उद्या 'मिशन ऊर्जा' अभियानाचा समारोप, 10 हजार विद्यार्थ्यांची रॅली 

Mission Urja Abhiyan: हिंगोलीत ‘मिशन ऊर्जा’ अभियान समाप्त करण्यासाठी 11 ऑगस्ट, 2026 रोजी एक जनजागृती रॅली आयोजित झाले आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन पालक मंत्री नरहरि झिरवळ यांच्या हस्ते

हिंगोलीत उद्या 'मिशन ऊर्जा' अभियानाचा समारोप, 10 हजार विद्यार्थ्यांची रॅली 

पालक मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार उद्घाटन

हिंगोली (Mission Urja Abhiyan) : जिल्ह्यात महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, अमली पदार्थ विरोध आणि रस्ते सुरक्षा या विषयांवर जनजागृती करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या "मिशन ऊर्जा" अभियानाचा समारोप सोमवार 11 ऑगस्ट 2026 रोजी हिंगोलीत होणार असल्याची माहिती सोमवारी पत्रकार परिषद. 

मिशन ऊर्जा च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा यांनी  सांगितले की, 3 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयां मध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या. चित्रकला, वक्तृत्व, घोषवाक्य, रांगोळी, निबंध आणि रील्स स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. 1930 सायबर क्राईम हेल्पलाईन, 112 पोलीस मदत आणि 1098 चाईल्ड हेल्पलाईन यांची माहिती देणारे फलक आणि बॅनर्सही शाळांमधून तयार करण्यात आले. जवळपास 35 हजार विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदीला असून पाच ते सात हजार पोस्टर प्राप्त झाले आहेत.

या (Mission Urja Abhiyan) अभियानाचा मुख्य कार्यक्रम उद्या 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता हिंगोली शहरात पार पडणार आहे. शहरातील इयत्ता 7 वी ते 12 वी च्या सुमारे 8 ते 10 हजार विद्यार्थ्यांची भव्य जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. बहुविध प्रशाला, जिल्हा परिषद मैदान येथून सुरू होणारी ही प्रभातफेरी संत नामदेव कवायत मैदानावर संपन्न होईल. 

रॅलीनंतर मुख्य कवायत मैदानावर महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते "मिशन ऊर्जा" जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. खासदार रामराव वडकुते, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार प्रज्ञाताई सातव, तान्हाजीराव मुटकुळे, संतोष बांगर, चंद्रकांत नवघरे, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात सरजुदेवी शाळा, माणिक स्मारक विद्यालय आणि भारतीय विद्या मंदिर येथील विद्यार्थी 112, 1930 आणि 1098 या आपत्कालीन क्रमांकांवर आधारित देखावे ड्रोनद्वारे सादर करतील. शेवटी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांकडून अमली पदार्थ विरोधी शपथ घेण्यात येणार आहे.

तसेच 12 ऑगस्ट रोजी ज्या शाळा- महाविद्यालयांमध्ये प्रोजेक्टरची सुविधा आहे, तेथे विद्यार्थ्यांची पथनाट्ये सादर होणार असून त्यानंतर पोलीस विभागातर्फे सुरक्षा विषयांवरील डॉक्युमेंटरी आणि PPT च्या माध्यमातून कायदे व सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सुरक्षित समाजासाठी तरुण पिढीला जागरूक करण्याच्या उद्देशाने राबवले जाणारे हे अभियान जिल्ह्यात मोठ्या उत्साहात राबवले जात आहे.

संबंधित सामग्री

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराबद्दल ॲड. वृषालीताई बोंद्रे यांचा सत्कार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराबद्दल ॲड. वृषालीताई बोंद्रे यांचा सत्कार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराबद्दल ॲड. वृषालीताई बोंद्रे यांचा महाविकास आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Sep 07, 2026
हिंगोली नगर पालिकेत पहिल्या महिला परिविक्षाधिन मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी स्विकारला पदभार

हिंगोली नगर पालिकेत पहिल्या महिला परिविक्षाधिन मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी स्विकारला पदभार

Hingoli Municipal Council: शासनाच्या नगर विकास विभागाने ७ ऑगस्टला काढलेल्या शासन आदेशात हिंगोली नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदी परिविक्षाधिन मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांची नियुक्ती

Aug 10, 2026
हर्षवर्धन सपकाळ यांच्या 'त्या' जहरी टीकेला राष्ट्रवादीचे चोख उत्तर...

हर्षवर्धन सपकाळ यांच्या 'त्या' जहरी टीकेला राष्ट्रवादीचे चोख उत्तर...

Harshvardhan Sapkal: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या सुनेत्राताई पवार यांच्यावर केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेचे तीव्र पडसाद

Aug 05, 2026
कन्हान येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे लुगडी प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप

कन्हान येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे लुगडी प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप

कन्हान येथे महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या लुगडी प्रशिक्षण शिबिराचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला.

Aug 01, 2026
आ. राजू नवघरे यांच्या हस्ते कुरुंद्यात ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा संपन्न

आ. राजू नवघरे यांच्या हस्ते कुरुंद्यात ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा संपन्न

MLA Raju Navghare: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व, अजित पवार यांच्या जयंती निमित्त जनसेवा सप्ताह आयोजित केलेल्या  विविध कार्यक्रमाचे उद्घाटक  आ. राजू नवघरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

Jul 27, 2026