हिंदूत्व कावड यात्रा

हिंदूत्वाच्या कावड यात्रेत लाखोंच्या संख्येने शिवभक्त सहभागी होण्याचा निर्धार

Hindutva Kavad Yatra: शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली मागील अनेक वर्षापासून कावड यात्रा काढली जाते. त्यानुसार यावर्षीही २४ ऑगस्टला हिंदूत्वाची भव्य कावड यात्रा

हिंदूत्वाच्या कावड यात्रेत लाखोंच्या संख्येने शिवभक्त सहभागी होण्याचा निर्धार

Hindutva Kavad Yatra

हिंगोली (Hindutva Kavad Yatra) : शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली मागील अनेक वर्षापासून कावड यात्रा काढली जाते. त्यानुसार यावर्षीही २४ ऑगस्टला हिंदूत्वाची भव्य कावड यात्रा काढली जाणार असल्याने त्याच्या नियोजन बैठकीत उपस्थित शिवभक्तांनी लाखोंच्या संख्येने कावड यात्रेमध्ये सहभागी होण्याचा निर्धार केला.

२४ ऑगस्टला कळमनुरी शहराजवळील चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली कयाधू नदीच्या तिरावरील ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत काढण्यात येणार्‍या कावड यात्रेच्या नियोजन संदर्भात शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत शिवभक्तांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत युवासेनेचे जिल्हा प्रमुख राम कदम, नगर परिषदेचे शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, नगरसेवक गणेश बांगर, सुभाष बांगर, राजेंद्र शिखरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय पाटील बोंढारे, शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा रेखाताई देवकते, राजेश्वर पतंगे, अनिल देशमुख, आर.आर. पाटील, अर्चना बहेन, अमोल पाटील, नगरसेवक खली बांगर, कपिल खंडेलवाल, सुमित कांबळे, गुड्डू बांगर, रविंद्र वाढे, विशाल गोटरे,  अक्षय लव्हाळे, अ‍ॅड. पंजाब चव्हाण, राजू चापके, सुरेश शेळके, अभय पाटील सावंत, निश्चल यंबल,  यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्तांची उपस्थिती होती.

यावेळी आमदार संतोष बांगर यांनी बोलताना दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी ही कावड यात्रा काढली जाणार असल्याने मोठ्या संख्येने (Hindutva Kavad Yatra) शिवभक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शिवभक्तांचा उत्साह वाढविण्याकरीता शिवसेनेचे युवा नेते डॉ. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मंत्र्यांची उपस्थिती राहणार असल्याची सांगितले. या बैठकीनंतर कावड यात्रेच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.

संबंधित सामग्री

आमदार संतोष बांगर यांच्या मागणीला यश; दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ होणार

आमदार संतोष बांगर यांच्या मागणीला यश; दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ होणार

MLA Santosh Bangar: महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले असताना दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी व इतर शैक्षणिक परीक्षा शुल्क माफ करण्यात

Sep 30, 2026
श्री राजस्थान बाल गणेश मंडळाकडून भव्य अन्नदान

श्री राजस्थान बाल गणेश मंडळाकडून भव्य अन्नदान

हिंगोलीतील चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी राजस्थान बाल गणेश मंडळाकडून भव्य अन्नदान; लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Sep 26, 2026
ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाचा कडक बडगा; लाऊडस्पीकर लावण्याआधी ₹1 लाख भरा! नियमभंग झाल्यास डिपॉझिट जप्त

ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाचा कडक बडगा; लाऊडस्पीकर लावण्याआधी ₹1 लाख भरा! नियमभंग झाल्यास डिपॉझिट जप्त

लाऊडस्पीकर परवानगीसाठी मंडळांना ₹1 लाख, व्यक्तींना ₹50 हजार डिपॉझिट. नियमभंग झाल्यास रक्कम जप्त; फटाके आणि लेझर लाईटवरही हायकोर्टाचे निर्बंध.

Sep 24, 2026
हिंगोलीच्या दसर्‍याचा खंड पडू देऊ नका: आ. संतोष बांगर

हिंगोलीच्या दसर्‍याचा खंड पडू देऊ नका: आ. संतोष बांगर

MLA Santosh Bangar: श्री सार्वजनिक दसरा महोत्सव सर्वदूर प्रसिध्द आहे. म्हैसूरनंतर हिंगोलीच्या दसर्‍याची ओळख आहे. त्यामुळे यावर्षीच्या दसर्‍यामध्ये प्रशासनाने खंड पडू देऊ नये

Sep 21, 2026
हिंगोलीच्या श्री जलेश्वर मंदिर व तलाव विकासासाठी 7 कोटींची मागणी; आ. संतोष बांगर यांचे पालकमंत्री झिरवाळ यांना निवेदन

हिंगोलीच्या श्री जलेश्वर मंदिर व तलाव विकासासाठी 7 कोटींची मागणी; आ. संतोष बांगर यांचे पालकमंत्री झिरवाळ यांना निवेदन

MLA Santosh Bangar: हिंगोली शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री जलेश्वर मंदिर व तलाव परिसराच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 मधून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार संतोष बांगर

Sep 08, 2026