हिंगोली सेंट्रींग मृत्यू

हिंगोलीत सेंट्रींगचे काम करताना जखमी झालेल्या मजूराचा मृत्यू

Hingoli Centering Work Death: हिंगोलीत बांधकामाचे ठिकाणावर काम करणारा ४० वर्षीय मजूर सेंट्रिंगचा प्लेट बसवत असताना डोक्यावर जखम झाली. उपचारासाठी रुग्णालयात नेले गेले आणि तेथेही मृत्यू झाला.

हिंगोलीत सेंट्रींगचे काम करताना जखमी झालेल्या मजूराचा मृत्यू

Hingoli Centering Work Death

 

हिंगोली शहर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद

हिंगोली (Hingoli Centering Work Death) : शहरातील सिध्दार्थ नगर भागामध्ये एका बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रींगचे काम सुरू असताना कोथळज येथील ४० वर्षीय मजूरदाराच्या डोक्यावर सेंट्रींगची प्लेट पडून जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. 

याबाबत पोलिस सुुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील सिध्दार्थ नगर भागामध्ये एका ठिकाणी बांधकाम सुरू होते. सदर बांधकामावर काही मजूरदार काम करीत होते. या ठिकाणी सेंट्रींगचे काम ५ जुलै रोजी सुरू असल्याने कोथळज येथील गजानन नारायण सुतारे (४०)  हा मजूरदार सुतारी काम करून सेंट्रींगच्या प्लेटा बसविता होता. या दरम्यान त्याच्या डोक्यावर सेंट्रींगची प्लेट पडल्याने गंभीररित्या जखमी झाल्याने उपस्थित असलेल्या मजूरदारांनी व इतरांनी त्यांना तात्काळ हिंगोलीतील रूग्णालयात दाखल केले होते.

या ठिकाणी त्यांच्यावर प्रथमोपचार करून नांदेड विष्णुपुरी येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना ६ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत हिंगोली शहर पोलिसात एस.के. गायकवाड यांनी दिलेल्या माहिती वरून आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुनिल अंभोरे हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026
एसटी बसची दुचाकीला जोरदार धडकेत वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु

एसटी बसची दुचाकीला जोरदार धडकेत वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु

ST Bus Accidental Death: कांद्री परिसरातील नागपुर-जबलपुर महा मार्गावर पेट्रोल पंपासमोर एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत ७० वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना

Sep 20, 2026
पावसाचा मोठा खंड पडल्याने आर्थिक विवंचनेतून उजनी येथील ४६ वर्षीय शेतकऱ्याची गोठ्यात गळफास लावून आत्महत्या

पावसाचा मोठा खंड पडल्याने आर्थिक विवंचनेतून उजनी येथील ४६ वर्षीय शेतकऱ्याची गोठ्यात गळफास लावून आत्महत्या

उजनी येथील ४६ वर्षीय शेतकरी श्रीमंत बिभीषण वळके यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणा आणि पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने ही घटना घडली.

Sep 13, 2026
अपघातात चौघांचा मृत्यू; पाच गंभीर जखमी

अपघातात चौघांचा मृत्यू; पाच गंभीर जखमी

Hingoli Accidental Death: वसमत तालुक्यातील कळंबा पाटीजवळ  सोमवारी दुपारच्या  सुमारास झालेल्या  ऑटोच्या भिषण अपघातात चौघांचा  मृत्यू झाला  असून पाचजण गंभीर  जखमी

Sep 07, 2026
नहाद येथील दाम्ंप्त्याचा मोटर सायकल अपघातात मृत्यू; एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार

नहाद येथील दाम्ंप्त्याचा मोटर सायकल अपघातात मृत्यू; एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार

Nahad Accidental death: कावड यात्रेचा महाप्रसाद घेऊन परत येत असताना नहाद शिवारात एका मोटर सायकल चालकाने त्यांच्या मोटर सायकलला दिलेल्या धडकेत दाम्ंप्त्यांचा मृत्यू झाला.

Sep 02, 2026