हिंगोली व्यवसायीक मृत्यू

हिंगोली शहरातील अपघातात गंभीर जखमी व्यवसायीकाचा मृत्यू

Hingoli Practitioner Death: हिंगोलीत व्यवसायीक कांचन प्रभाकर गुंडेवार यांना वाहनाने धडक देऊन त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर त्यांना विविध रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.

हिंगोली शहरातील अपघातात गंभीर जखमी व्यवसायीकाचा मृत्यू

Hingoli Practitioner Death

हिंगोली (Hingoli Practitioner Death) : शहरातील व्यवसायीक कांचन प्रभाकर गुंडेवार यांच्या स्कुटीला एका भरधाव वाहनाने २७ मार्चला रात्री ८.३० च्या सुमारास धडक दिली होती. प्रारंभी त्यांना हिंगोली जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने नांदेड येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले होते. या ठिकाणी त्यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. त्यानंतरही प्रकृती चिंताजनक झाली असताना ३० मार्च रोजी दुपारी १२.५० वाजता त्यांचा मृत्यू झाला.

जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यांच्यावर (Hingoli Practitioner Death) अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, जावाई,नातवंड असा परिवार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संचित गुंडेवार यांचे ते वडील होत.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; चोंडीआंबा टि-पॉईंट पेट्रोलपंपा जवळील घटना

शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; चोंडीआंबा टि-पॉईंट पेट्रोलपंपा जवळील घटना

Chondiamba Armed Attack Death: वसमत तालुक्यातील चोंडी आंबा टी-पॉईंटवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या आवारात ६ ऑक्टोबर मंगळवार रोजी धारदार शस्त्राने हल्ला

Oct 06, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026