पेट्रोल-डिझेल नियम

पेट्रोल पंपावर नियमांचे काटेकोर पालन, शेतकरी पोहचले जिल्हाधिकारी कार्यालयात 

Petrol-Diesel Rules: हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी २० मे रोजी पेट्रोल आणि डिझेल बाटलीत किंवा कॅनमध्ये देण्याची कटेकोरता जपण्याचा आदेश दिला

पेट्रोल पंपावर नियमांचे काटेकोर पालन, शेतकरी पोहचले जिल्हाधिकारी कार्यालयात 

Petrol-Diesel Rules

 

हिंगोलीत कॅन, ड्रम किंवा बाटलीत पेट्रोल-डिझेल देण्यास बंदी
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गुरुवारी पेट्रोल पंपा समोरील रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा

हिंगोली (Petrol-Diesel Rules) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कॅन, ड्रम किंवा बाटलीत पेट्रोल-डिझेल देण्यास बंदी घातल्याने नियमांचे पालन सुरू झाले आहे. प्रत्येकाला दोन हजाराचे डिझेल देण्यात यावे असेही आदेशात नमूद असल्याने शेतकऱ्यांना २० मे बुधवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत दोन हजारांच्या डिझेलसाठी पाचशे रुपयांचा खर्च लागत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान शहरातील विविध पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली होती शहरातील अनेक रस्त्यांवर देखील वाहने उभी असल्याचे चित्र होते.

 जिल्ह्यातील सर्व पेट्रोल-डिझेल पंप (Petrol-Diesel Rules) चालकांनी बाटली किंवा कॅनमध्ये इंधन देऊ नये असे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले असून २१ मे गुरुवारपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पेट्रोलपंप चालकांना दिल्या आहेत. पेट्रोल किंवा डिझेल प्लास्टिक बाटलीत किंवा कॅनमध्ये नेणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे पंपांवर केवळ वाहनांनाच इंधन पुरवठा करावा, अशा स्पष्ट सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.

कॅन, ड्रम किंवा बाटलीत पेट्रोल-डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे तसेच दोन हजार रुपयांचे डिझेल देण्याच्या सूचना दिल्या आहेत मात्र दोन हजारांचे डिझेल घेण्यासाठी पाचशे रुपयांचा खर्च करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधित पंप धारकावर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिला आहे. या आदेशानंतर 20 मे रोजी सकाळ पासूनच हिंगोली शहरातील बऱ्याच पेट्रोल पंपावर रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या परिणामी वाहतूक व्यवस्था ही कोलमडली होती.

संबंधित सामग्री

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
पेट्रोल-डिझेल महागले! नायरा एनर्जीने पेट्रोल ₹5 तर डिझेल ₹3 प्रति लिटरने वाढवले; पाहा नवे दर

पेट्रोल-डिझेल महागले! नायरा एनर्जीने पेट्रोल ₹5 तर डिझेल ₹3 प्रति लिटरने वाढवले; पाहा नवे दर

नायरा एनर्जीने पेट्रोल ₹5 आणि डिझेल ₹3 प्रति लिटर महाग केले. मुंबई, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरांतील आजचे इंधन दर जाणून घ्या.

Oct 03, 2026
रात्री 8 नंतर लॉकडाऊन? पाकिस्तानातील ‘स्मार्ट लॉकडाऊन’च्या चर्चेचे नेमके सत्य काय?

रात्री 8 नंतर लॉकडाऊन? पाकिस्तानातील ‘स्मार्ट लॉकडाऊन’च्या चर्चेचे नेमके सत्य काय?

इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात चार दिवसांचा कामाचा आठवडा, सरकारी वाहनांवर निर्बंध आणि बाजारपेठांच्या वेळेत कपातीचे प्रस्ताव चर्चेत आहेत.

Sep 16, 2026
सौदीची तेल पाइपलाइन बंद; कच्च्या तेलाचा भाव १०९ डॉलरवर, भारताच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीची चिंता

सौदीची तेल पाइपलाइन बंद; कच्च्या तेलाचा भाव १०९ डॉलरवर, भारताच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीची चिंता

सौदी अरेबियातील ड्रोन हल्ल्यानंतर १,२०० किमी लांबीची पूर्व-पश्चिम तेल पाइपलाइन तात्पुरती बंद झाली. कच्च्या तेलाचा भाव १०९ डॉलरवर पोहोचल्याने भारताच्या इंधन दरांबाबत चिंता वाढली.

Sep 12, 2026
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 100 डॉलरच्या उंबरठ्यावर; पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 100 डॉलरच्या उंबरठ्यावर; पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग?

Petrol-Diesel Price Hike: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारावर होत आहे. ब्रेंट कच्च्या तेलाचा दर 100 डॉलर प्रति बॅरलच्या उंबरठ्यावर पोहोचला कच्च्या

Sep 11, 2026