हिंगोली खून प्रकरण

हिंगोलीतील खून प्रकरण तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

Hingoli murder case: आरोपीच्या भाचीची छेडछाड केल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीचा मुलगा मयत शुभम सखाराम राजे याचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरलेल्या आरोपींना 'जन्मठेप

हिंगोलीतील खून प्रकरण तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

Hingoli murder case

 

जिल्हा न्यायाधीश एस.एन.माने-गाडेकर यांनी सुनावला निकाल 

हिंगोली (Hingoli murder case) : शहरातील तलाबकट्टा परिसरातील मारोती मंदिराजवळ आरोपीच्या भाचीची छेडछाड केल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीचा मुलगा मयत शुभम सखाराम राजे याचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरलेल्या आरोपींना 'जन्मठेपेची व  १,६० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधीश-१ एस. एन. माने-गाडेकर यांनी ६ जुलै रोजी सुनावली आहे.

फिर्यादी शोभाबाई सखाराम राजे, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  १८ एप्रिल २०२२ रोजी रात्री ९:३० ते ०९:४५ वा. दरम्यान हिंगोली शहरातील तलाबकट्टा परिसरातील मारोती मंदिराजवळ फिर्यादीचा मयत मुलगा शुभम सखाराम राजे याने (Hingoli murder case) आरोपीच्या भाचीची छेडछाड केल्याच्या कारणावरून त्यांच्यात झालेल्या वादावरून व त्याचा बदला म्हणून आरोपी  बबलु उर्फ बाबा सुभाष धाबे , रा.तलाबकट्टा, हिंगोली संतोष उर्फ मोहन चिंतामणराव जोरेवार, रा.वाशिम, जि.वाशिम, ह.मु. तलाबकट्टा हिंगोली, विशु उर्फ विश्वास संजय मेकवाल , रा.पुसद ता.पुसद जि. यवतमाळ, ह.मु. तलाबकट्टा, हिंगोली  यांनी गुप्ती, लोखंडी रॉड व खंजिर ने जबर मारहाण करून त्याचा खून केला अशा आशयाची तकार पोलीस ठाणे हिंगोली शहर येथे १९ एप्रिल  २०२२ रोजी दिली होती. सदर प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक, व्हि.पी.विठूबोने यांनी सखोल तपास करून दोषारोपपत्र जिल्हा न्यायालय हिंगोली येथे दाखल करण्यात आले होते.

सहा जुलै सोमवार रोजी  जिल्हा न्यायाधीश-१, हिंगोली, श्रीमती एस.एन. माने-गाडेकर यांनी खुन केल्याप्रकरणी आरोपी बबलु उर्फ बाबा सुभाष धाबे, रा. तलाबकट्टा, हिंगोली  संतोष उर्फ मोहन चिंतामणराव जोरेवार, रा.वाशिम, जि.वाशिम, ह.मु. तलाबकट्टा हिंगोली, विशु उर्फ विश्वास संजय मेकवाल, रा. पुसद ता.पुसद जि. यवतमाळ, ह.मु. तलाबकट्टा, हिंगोली यांना दोषी ठरवत तिन्ही आरोपींना कलम ३०२ भादंवि प्रमाणे जन्मठेप तसेच प्रत्येकी रु.५० हजार रुपये दंड (दंड न भरल्यास सश्रम कारावास), तसेच आरोपी क्रमांक ३  विश्वास संजय मेकवाल कलम ३२४ भादंवि प्रमाणे १ वर्ष सश्रम कारावास व रू.१० हजार रुपये दंड (दंड न भरल्यास सश्रम कारावास), आणि एकूण आकारण्यात आलेल्या दंड रक्कमेपैकी रू.१ लाख रक्कम ही मयताची आई (फिर्यादी) न शोभाबाई सखाराम राजे यांना देण्याचे आदेशित करण्यात आले. तसेच फिर्यादी व जखमी साक्षीदार अजय सुभाष चोपडे यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांना दिले.

सदर प्रकरणात (Hingoli murder case) सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील एन.एस. मुटकुळे यांनी बाजू मांडली व न्यायालय समक्ष एकूण १७ साक्षीदार तपासले तसेच अंतिम युक्तिवाद सादर केला. त्यांना सहायक सरकारी वकील एस.डी. कुटे व  सविता एस. देशमुख-जाधव यांनी सहकार्य केले. सदर प्रकरणी कोर्ट पैरवी पोलीस हवालदार  .बी. गव्हाणे, पो.स्टे. हिंगोली शहर यांनी सहकार्य केले.

संबंधित सामग्री

खुन प्रकरणातील तीन आरोपींना पोलिस कोठडी

खुन प्रकरणातील तीन आरोपींना पोलिस कोठडी

Hingoli murder case: या प्रकरणात वसमत शहर पोलिसात १० सप्टेंबरला पवन डाखोरे यांच्या फिर्यादीवरून ऋषिकेश कंठाळे, अर्जुन बोचकरी, अनिकेत देवकर सर्व रा. वसमत या तिघांवर गुन्हा दाखल झाला

Sep 11, 2026
बदलापूरमधील नारायणा इंग्लिश मीडियम स्कूलविरोधात शिक्षण विभागाची मोठी कारवाई; अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापकांवर गुन्हा

बदलापूरमधील नारायणा इंग्लिश मीडियम स्कूलविरोधात शिक्षण विभागाची मोठी कारवाई; अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापकांवर गुन्हा

शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर बदलापूरमधील एका शाळेविरोधात शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली आहेत.

Jul 18, 2026
पहिली ते दहावी मराठी अनिवार्य; नियमभंग करणाऱ्या शाळांवर १ लाखांचा दंड

पहिली ते दहावी मराठी अनिवार्य; नियमभंग करणाऱ्या शाळांवर १ लाखांचा दंड

राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषयाचे अध्यापन आणि त्याची परीक्षा घेणे सक्तीचे करण्यात आले.

Jun 30, 2026
हिंगोलीतील खून प्रकरणात फरार आरोपींना तात्काळ अटक करणार

हिंगोलीतील खून प्रकरणात फरार आरोपींना तात्काळ अटक करणार

Hingoli Murder Case: गोलीत पाच महिन्यांपूर्वी झालेल्या सय्यद कलिम सय्यद सलिम यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक केली जाईल, असे आश्वासन

Jun 29, 2026